Saturday, January 30, 2016

मला आठवतंय..


मला आठवतंय ..... 




Thursday, January 21, 2016

बुरसटलेली बुद्धिजीवी

बुरसटलेली बुद्धिजीवी 


आपले आस्तित्व टिकवण्यासाठी माणसाने बराच संघर्ष केला, वेग वेगळे शोध लावले, माणसाने बरीच प्रगति केली, कित्येक प्रतिकूल परिस्थितिवर मात करून तो २१व्या शतकामध्ये  आला आहे. एव्हाना आत्ता तो खूपच प्रगत आहे , सर्वच गोष्टीने,
पण खरच तो एवढा बुद्धिवान झाला आहे का? एवढे सर्व सुख सोयी मिळवून सुद्धा तो सुखी आहे का? पूर्वीचा माणूस आणि आत्ताचा माणूस ह्याच्या मानसीकतेमध्ये  काही बदल झाला आहे का? की तो तसाच आहे जसा आधी होता तसा? 
  
साधारण गेल्या १५-२० वर्ष्यात माणसाच्या जीवनात खूपच बदल झाला. झपाट्याने जग बघता बघता जवळ आले, वैद्यानिक क्रांति झाली, इंटरनेट, सोइल नेटवर्कमुळे लोकांना जग ठेंगने वाटू लागले, त्याचे चांगले परिणाम आणि प्रभाव पण दिसू लागला आणि त्यामुळेच एक गुपित काळी बाजू पण समोर येऊ लागली. मी वाढत्या  विज्ञानाला किव्हा तंत्रज्ञानाला दोष नाही देत, एखादा शोध लावतो तेव्हा काळाची गरज बघून चांगल्या गोष्टीसाठी शोध लावला जातो उदा.- औषधशास्त्र, वैध्यकीयशास्त्र , रसायनशास्त्र, संगणक, आधुनिक हत्यारे  आणि बरेच काही शोध लागले ते समाज्याच्या कल्याणासाठी पण आता त्याचा वापर कश्यासाठी, कसा होतोय हे पण आपल्याला माहिती आहे. एकाला लाभलेलं वरदान हे दुसऱ्यासाठी शाप बनत चालले आहे. मग हे शोध चुकीचे होते का? फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत का? नाही नक्कीच नाही. 

मग, ह्यात चुकी कोणाची? कोणाचा दोष आहे? मी तर असेच म्हणेन कि ह्यात दोष आहे बुरसटलेल्या बुद्धीजीवींचा अर्थात ठराविक माणसांचा, त्यांच्या गंजलेल्या मनाचा, अशी माणसे ज्यांचे सामाजिक कार्य शून्य आहे, अशी माणसे जे समाज्यात आपले अस्तित्व खोट्या गोष्टींच्या आधारावर शोधत बसलेली आहेत. ती हीच माणसे आहेत जी किड्या मुंग्यांसारखी जन्माला येतात आणि  किड्या मुंग्यांसारखी मरून जातात. ह्या अश्या लोकांनी विज्ञानाचा वापर चुकीचा केला. 

अशी माणसे आधी दिसत नव्हती का ?आताच कशी दिसू लागली? असे काही लोक म्हणू शकतात. पण तसे नाही, ह्या आधी हि अशी लोक होती पण इंटरनेट, प्रींटमेडिया, फेसबुक, व्हाट्स -आप मुळे समाज्यात किती विक्षिप्त लोक आहेत ह्याची जाणीव आता होत आहे. पूर्वी अश्या लोकांना साधे भोळे समजत असत आपण, हल्ली फेसबुक प्रोफाईल बघितले तरी समजते माणसाची मनोवृत्ती किती खालच्या तलाची आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हाट्स -आप मुळे माणूस माणसाच्या खरच जवळ आली का हो? 


जागतिक दहशतवादी संघटना  इंटरनेटचा वापर त्यांचे साम्राज्य पसरवण्यासाठी करत आहे, नुसत्या फेसबुक कॉम्मेंट मुळे लोकांचे जीव जाऊ लागले आहेत. जगात सेल्फीच्या आहारी जाऊन आत्तापर्यंत खूप लोक मेले त्यात सर्वाधिक म्हणजे  तब्बल २७ लोक मेले आहेत जे भारतीय होते. मृत देहासोबत जेव्हा सेल्फी पाहण्यात आल्या तेव्हा संवेदनाहीन तो मेलेला मृत धड आहे कि हा फोटो काढणारा असा प्रश्न स्वत्तला पडायला लागला आणि हे तंत्रज्ञानाच्या आती वापरामुळे झाले नाही तर माणसाने बुद्धी गहाण ठेवली म्हणून झाले  … स्टीव जॉब्स, बिल गेट, मार्क झुकरबर्ग ह्यांनी पण तंत्रज्ञानाचा वापर केलाच पण त्यामुळे त्यांचे काही नुकसान नाही झाले, फायदाच झाला आहे. कट्ट्या वरती, कोपऱ्या वरती जाउन मित्रांच्यात रमणारी लोक हल्ली व्हाट्स -आप ग्रुप वर वाद-विवाद करत बसलेली दिसतात. बाथरूम पासून ते बेडरूम पर्यंत सोबतीला हल्ली  मोबाईल असतोच,  महिलांच्या फसवणूकीचा मुद्दा तर नेहमीच  ऐरणीवर असतो.

सोइल नेटवर्क साईटवर प्रत्येकाने आपल्या सोयीचा झेंडा उचलला आहे, प्रत्येकाने आपले आपले रंग वाटून घेतले आहेत आणि ह्यातून वाद विवाद होऊन जे गुन्हे घडत आहेत ते अश्या कोत्या मनाच्या वृत्तीमुळेच नाहीतर ग्रुप मधून काढले म्हणून अडमीन वर चाकू हल्ले झाले नसते.

लोक्कांना विचार करण्याची वेळ आली आहे खरच आपण ह्या सर्व गोष्टीच्या आहारी गेलो आहे का? सवयीचे रुपांतर जेव्हा व्यसना मध्ये होते तेव्हा येणार्या परिणामाला सामोरे जाण्याची पण सवय आताच लावून ठेवलेली बरी, येणारा काळ अजून खूप काही घेऊन येणार आहे.



Monday, January 18, 2016

नविन उद्योग अयशस्वी का होतात?



               
                                           
                 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच  देशातील तरुणांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या महत्त्वाकांशी योजनेचा शुभारंभ केला. त्याचे स्वागत आहे . अशा पद्धतीच्या योजनांची गरज होती
आपल्याला माहित आहे नविन उद्योगाची  (स्वयं रोजगारची ) आजच्या तरुणानां किती गरज आहे, वाढती महागाई, बदलत चाललेले मॉडर्न लाइफ स्टाइल आणि त्याच बरोबर वाढत चाललेली बेरोजगारी ही देशाची त्याच बरोबर प्रत्येक  युवकांची आजची समस्या आहे. आत्तापर्यंत आपण बघत आलो आहे की खुप छोटे - मोठे उद्योग आपल्या अजु बाजूला उभे राहिले पण त्यातले किती यशस्वी झाले? हे जर पाहिले तर खूपच कमी नविन उद्योजक यशस्वी झाले आहेत.

असे का होते ? नविन उद्योग अयशस्वी का होतात, त्यांच्या पुढे नक्की कश्याचा अडथळा येतो ह्यावर आज आपण बोलुयात

कोणताही नविन उद्योग सुरु  करण्याआधी आणि नविन उद्योग सुरु केल्यानंतर ते  अयशस्वी का होतात त्याची कारणे पाहुयात

 प्रमुख कारणे :
  1. व्यवसायची निवड -                                                                                                                                                     व्यवसायची निवड ही सर्वात पहिली पायरी आहे, नविन  व्यवसाय सुरु केल्या नंतर काही काळाने आपल्याला वाटते आपण चुकीच्या क्षेत्रात तर नाही ना आलो? व्यवसाय कुठलाही असो , त्या व्यवसायाची निवड करताना आज बाजारमध्ये कश्याची मागणी आहे (मार्केट ट्रेन्ड काय आहे ) आणि आपल्याला काय जमते (त्या विषया मधे आपले किती knowledge आहे ) हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्या भारतात किव्हा भागात म्हणा हवे तर पाउला-पाउला वरती वेगवेगळी मागणी असते, त्यातून आपल्याला योग्य मागणी लक्ष्यात घेऊन त्या संबंधीत व्यवसाय निवडण्याची गरज असते. मंदिराच्या बाहेर हार-फुल नारळचाच व्यवसाय जास्ती होतो हे कळाले पाहिजे. योग्य गरज ओळखून तसा पुरवठा करने गरजेचे असते.                                                                                                                      
  2.   आर्थिक भांडवल /गुंतवणूक -                                                                                                                                      बऱ्याच वेळा  व्यवसायची निवड होते पण नविन लघू उद्योगाची सुरुवात करायला  मोठा अडथळा असतो तो आर्थिक भांडवलचा म्हणजेच व्यवसाय उभारणीसाठी लागणारा पैसा उभा करणे. ब्यँकांचा सावध पावित्र्या मुळे हे आर्थिक भांडवल सहजरित्या मिळणे थोड़े कठीन होते. ज्यानी नव्याने उद्योग सुरु केलेले आहेत त्यांना वाढती टेक्नोलॉजी , व्यवसायाचा विस्तार ह्या गरजा पूर्ण करण्या साथी निधि लागतोच, निधि अभावी व्यवसाय जास्ती वेळ तग धरु शकत नाही. व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर योग्य वेळी योग्य पैसा गुंतवणे गरजेचे असते. आर्थिक सुनियोजन आणि व्यवस्थापन च्या अभावामुळे  व्यवसायात आपण अयशस्वी होतो.                                                                                                                                                                                          
  3. भीति/जोखिम  -                                                                                                                                                        व्यवसायात उतरण्या आधीपासूनच हा घटक आपल्यामधे ठान मांडतो. भीति ही वेगवेगळी असू शकते उदा. व्यवसायात बुडण्याची भीति (पैसा ) , व्यवसाय अयशस्वी होण्याची भीति, उत्पादन न चालण्याची भीति, व्यवसाय वाढीचे निर्णय चुकण्याची भीति, अशी अनेक प्रकारची भीति असते. काही व्यवसाय मधे कायद्याच्या  भीतिचे सावट नेहमीच असते उदा - डॉक्टर्स, फॉरेंसिक लॅब , ड्रग्स एंड केमिकल होटल्स एंड बार इत्यादि. ह्या भीतीने जे सध्या चालु आहे त्यातच आपण समाधानी आहोत असा समज करून व्यवसाय वृद्धि साठी काहीच न केल्याने आपण बाजारात जास्ती दिवस टिकुन  नाही राहु शकत. व्यवसाय म्हंटले की जोखिम आलीच हे वास्तव आपण विसरून चालणार नाही. म्हणून जोखिम , भीति हा पण एक घटक आहे ज्यामुळे व्यवसायात आपण अयशस्वी होतो.                                                                                                                                                                        
  4.  व्यवसायीक भागीदार आणि टीम -                                                                                                                                एका सर्वे नुसार असे  पाहण्यात आले आहे की भागीदारीमध्ये व्यवसाय हा एकट्याच्या व्यवसायापेक्ष्या चांगला होतो पण तो भागिदार योग्य व्यक्ति असेल तरच. अनेक वेळा व्यवसायीक भागीदारांमधे वाद/कलह , मतभेद होतात परिणामी व्यवसाय अयशस्वी होतो. योग्य  भागीदार मिळाला तर व्यवसायात  लवकर जम बसतो, निधीचा पर्याय प्राप्त होतो पर्यायाने  भाग भांडवल वाढते, नविन युक्त्या, मत, सल्ला सहज मिळु शकतो, नाही तर "हाउसिंग डॉट कॉम" चे  उदाहरण आपण पाहिले आहे. नविन उद्योगांमध्ये व्यावसायिक संघ (Team) चा सुद्धा खुप मोठा सहभाग असतो. काही उद्योगांमध्ये उच्च पदे गरजेचे असतात काही उद्योगांमध्ये तेवढे गरजेचे नसते. टीमची प्रेरणा(motivation), त्यांची निष्ठा(dedication) ह्यावर व्यवसाय यशस्वी- अयशस्वी अवलंबून असते.                                                                                                            
  5. व्यवसाईक प्रशिक्षणाचा अभाव-                                                                                                                                 आधीच आपल्या भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रक्टिकल ला खुप कमी लेखण्यात आले आहे. ह्या कारणाने जेव्हा व्यवसायामध्ये आपण जातो तेव्हा आपल्याला कळते की आपला पायाच मजबूत नाही. त्या नंतर ही व्यवसायीक प्रशिक्षण किती लोक घेतात? हा ही एक प्रश्न आहे. सर्व गोष्टी आपण आउटसोर्स करू नाही शकत, व्यवसायाच्या सुरुवातीला सर्व धुरा आपल्याला संभाळायला यायला हव्यात , सेल्स, ह्यूमन रिसोर्स , मैनेजमेंट ह्या कला आधिपासूनच यायला हव्यात , पण तसे होत नाही हेही एक कारण आहे ज्यामुळे आपण व्यवसायात अयशस्वी होतो. 
ह्या व्यतिरिक्त अजुन काही मुद्दे आहेत जसे शासकीय योजनेचा उपयोग करून न घेणे , जागतिक घडामोडी अवगत करने   पण वरील मुद्दे जास्ती विचारात घेतले गेले पाहिजे असे मला वाटते. भारत सरकार ने काही मुद्यांवर खुप विचार करून देशातील तरुणांच्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया’ या महत्त्वाकांशी योजनेचा शुभारंभ केला आहे .

"स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया" योजनेच्या काही महत्वाच्या घोषणा...

  • स्टार्ट अप’साठी नऊ कामगार कायदे आणि पर्यावरण कायद्यांमध्ये ‘सेल्फ सर्टिफिकेशन’ लागू होणार.
  • तीन वर्षांपर्यंत कोणत्याही प्रकारची सरकारी पाहणी (इन्स्पेक्‍शन) होणार नाही
  • ‘स्टार्ट अप इंडिया हब’ सुरू करणार. सरकारशी संपर्कासाठी हे केंद्र असेल.
  • सरकार मित्र, सहकारी या नात्याने काम करेल. त्यासाठी ‘हॅंड होल्डिंग’ (मदतीचा हात देणारी) व्यवस्थेवर भर असेल.
  • एका दिवसात ‘स्टार्ट अप’ सुरू करता यावे मोबाईल ऑप करणार. याद्वारे छोटेखानी आणि सुटसुटीत अर्ज करता येईल.
  • बौद्धिक संपदेच्या (इंटेलेक्‍चुअल प्रॉपर्टी) संरक्षणासाठी सरकार कायदेशीर मदत करेल.
  • पेटंट मिळविण्यासाठीची नोंदणी निःशुल्क करण्याचा सरकार प्रयत्न करेल.
  • ‘स्टार्टअप’ अंतर्गत पेटंट अर्ज सादर करण्याच्या शुल्क ८० टक्‍क्‍यांची घट.
  • ‘स्टार्टअप’ उद्योगांमार्फत सरकारने खरेदी करावी यासाठी नियमांमध्ये बदल होणार.
  • उद्योग बंद करण्यासाठीची (एक्‍झीट) सरकारी व्यवस्था वेगवान करणार. ९० दिवसांत एक्‍झिट करण्यासाठी नवा कायदा आणणार.
  • ‘स्टार्टअप’ उद्योगांना भांडवली लाभ करात (कॅपिटल गेन टॅक्‍स) सूट मिळेल.
  • ‘स्टार्टअप’ उद्योजकांना तीन वर्षे प्राप्तिकरातून सूट असेल.
  • महिला उद्योजकांची वाढती संख्या पाहता, त्यांच्यासाठी सरकार स्वतंत्र नवी योजना आणणार.
  • नव्या कल्पनांना पाठबळ देण्यासाठी ‘अटल इनोव्हेशन मिशन’ सुरू करणार
  • ‘स्टार्टअप’ला सरकार बीज भांडवल देणार
  • ‘स्टार्टअप’च्या आर्थिक सहाय्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा पत हमी निधी स्थापन करणार.
  • खासगी-सरकारी भागीदारीतून इन्क्‍युबेटर्स तयार करणार
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी शोधकार्याचे प्रकल्प राबविणार. याअंतर्गत दहा लाख विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार.
  • ‘स्टार्टअप’ प्रसारासाठी नियमित कार्यक्रम राबविले जाणार. 
तर असा हा  शासनाचा तरुण उद्योजकांसाठी अत्यंत चांगला उपक्रम आहे , असा उपक्रम ही काळाची गरज आहे.

Friday, January 1, 2016

नमस्कार मित्रांनो ,
                   !! नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा. !!!
                  माझ्या विचारांना व्यक्त करण्यासाठी , "मुक्त संचार" हा ब्लॉग लिहिण्याचा संकल्प मी २०१६ च्या पहिल्या दिवशी करत आहे. मुक्त संचार मधून मी राजकीय , सामाजिक तसेच माझे स्वताचे अनुभव , काल्पनिक कथा, कविता ह्या वर भाष्य करणार आहे. सदर विषया बद्दलचे लिखाण  हे माझे वैयक्तिक मत/ विचार असणार आहेत.
                 लिखाण मराठीत असल्या कारणाने मराठी व्याकरण चुकण्याची शक्यता आहे, तरी चूका टाळून  साध्या भाषेत लिहिण्याचा मी प्रयत्न करेन.