Monday, July 24, 2017

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सरकारी संस्थांचा निधी


"देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सरकारी संस्थांचा निधी सरकार ने कमी केलाय" , या विषयावर वृत्तपत्रातील संपादकीय पासून ते सोशल मीडियापर्यंत अनेक चर्चा वाचायला मिळाल्या. खरं तर त्या एकअंगी वाटल्या, अश्या महत्वाच्या विषयावर फक्त वरवर न बघता, त्यांच्या खोलात उतरणे गरजेचे आहे, काही लोकांना अश्या संस्था कोणत्या आहेत, त्या काय काम करतात, किंवा त्यांनी आतापर्यंत काय शोध लावले यापैकी काहीही माहित नसताना फक्त काही आरोपांचा संदर्भ घेऊन त्यावरून राईचा पर्वत करताना दिसत आहेत.

सुरुवातीला आपण हि गोष्ट मान्य केली पाहिजे की ग्लोबल टर्मचा विचार करता आपल्या देशातील "विज्ञान आणि तंत्रज्ञान" क्षेत्रातील संस्थांवर आपला एकूण खर्च आपल्या बजेट नुसार खूपच कमी आहे. संशोधनासाठी देऊ केलेली आर्थिक तरतूद हि सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 1 टक्केच्या आसपास सुद्धा नाही. आपल्या अश्या पॉलिसी का आहेत किंवा तश्या त्या असाव्यात का? किंवा त्यात बदल करायला हवा का? आपल्या प्राओरिटी बदलायला हव्यात का? हा दुसरा मुद्दा आहे. खरं तर यावर आपण बोललं, लिहलं पाहिजे.

तर मूळ मुद्यावर बोलूया, अश्या सर्व संस्थांचा निधी कपात केलेला नाही, काही विशिष्ट संस्थांचा नक्कीच केलाय. का केलाय त्याला हि अनेक कारणे आहेत. तुम्ही दुसरी बाजू समजून घेणे गरजेचे आहे. केवळ  एका किंवा दोन वर्ष्याच्या निधी वाटपावरून सरकार वर आरोप प्रत्यारोप करणे चुकीचं ठरेल. 

सरकारच असं म्हणणं आहे की फक्त एखाद्या बेसिक रिसर्च करून पुढे जर काहीच इम्प्लिटेशन किंवा ते अँप्लिकेबल होणार नसेल तर असा रिसर्च पॉइंटलेस आहे. बेसिक रिसर्च आणि त्याचे डेव्हलपमेंट याचा आपल्याला समन्वय साधता आला पाहिजे. रिसर्च चा उपयोग गरीब आणि सामान्य जनतेला कसा उपयोगी पडेल यावर काम केले गेल पाहिजे. रिसर्च कमर्शिअलाइज झाले पाहिजेत. संशोधन करणाऱ्या अश्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांनी आता फक्त सरकारी निधी मिळवणे हि आतापर्यंतची सवय सोडली पाहिजे.

गेल्या वर्षी डेहराडून येथे चिंतन शिबिर झाले त्यात त्यांनी हे स्पष्ट सांगितले आहे की संशोधन करणाऱ्या संस्थांनी, फक्त सरकारी निधीवर अवलंबून राहू नये त्यांनी स्वतः प्रॉफिटसाठी काम करून बाहेरून निधी कसा मिळेल ह्यावर काम करावे.

आधीच्या म्हणजे 2016-17च्या तुलनेत 2017-18 साठी  सरकारने बजेट मध्ये किती निधी दिलाय या बाबत काही आकडेवारी पाहूया:
(आपण एकूण बजेटच्या किती टक्के निधी रिसर्च वर खर्च करतोय याचे आकडे मला मिळू शकले नाहीत.)
 
Ministry of Science and Technology मध्ये मुख्य तीन विभाग येतात.
  Department of Science & Technology (DST)
  Department of Biotechnology (DBT) आणि ,
  Department of Scientific and Industrial Research.


 Department of Science and Technology ला  2017-18साठी Rs 4836 करोड निधी देण्यात आला म्हणजे आधीपेक्षा म्हणजे 2016-17ला RS 4493 करोड देण्यात आला होता. हा निधी या वर्षी 7.7% जास्ती दिला गेला आहे.

Department of Biotechnology ला  2017-18साठी  Rs 2222 करोड रुपये देण्यात आले आहे. ह्या आधी म्हणजे 2016-17ला RS 1917 करोड देण्यात आले होते. हा निधी या वर्षी 16% जास्ती वाढवून देण्यात आले आहे.

Department of Scientific and Industrial Research साठी सध्या 2017-18साठी  Rs 4446 करोड रुपये देण्यात आले आहे. या आधी म्हणजे 2016-17ला RS. 4062 देण्यात आले होते. हा निधी या वर्षी 10% जास्ती वाढवून देण्यात आले आहे.

Department of Atomic Energy ला 2017-18 साठी Rs 12,461.2 करोड देण्यात आले आहे. 2016-17ला हाच निधी RS.11383 करोड एवढा देण्यात आला होता म्हणजे आधीपेक्षा ९% जास्ती देण्यात आलेत, म्हणजेच Bhabha Atomic Research Centre (BARC) and Tata Institute of Fundamental Research (TIFR) या संस्थांच्या निधीमध्ये कपात केलेली नाही.

Ministry of Science and Technology, the Department of Atomic Energy (DAE), the Department of Space and the Department of Earth Sciences यांना एकत्रित Rs 34,759.77 करोड रुपयांचा निधी आधीच्या पेक्ष्या 11% ने वाढवून देण्यात आला आहे.

Space Department, ज्याचा मुख्य उद्देश 2018 मध्ये दुसऱ्यांदा चंद्र मोहीम आहे त्यासाठी Rs 9,093.71करोड देण्यात आला आहे गेल्या वेळी म्हणजे 2016-17साठी हाच निधी 8045.28 एवढा दिला होता. म्हणजे 13% जास्ती चा निधी या वर्षी देण्यात आला आहे.

Ministry of Earth Sciences, जे कि वातावरण बदल याचा अभ्यास करते त्याला Rs 1723 करोड देण्यात आले आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2016-17 ला RS.1566 करोड निधी देण्यात आला होता.

शैक्षणिक संस्थेना तर भारी रक्कम देण्यात आली आहे, 2017-18 साठी Rs 79,686 करोड निधी दिलेला आहे , आधी 2016-17 साठी Rs 72,394 करोड देण्यात आला होता. यातून IIT सारख्या संस्थानां Rs 3,000 करोड निधी योजला आहे.

Health ministry साठी 2017-18 ला Rs 48,852 एवढा मोठा निधी देण्यात आलेला आहे. आधी 2016-17 साठी हाच निधी Rs. 39,888 करोड एवढा होता. National AID'S Control Organization (NACO) साठी असलेले प्रोजेक्ट्स आणि निधी कमी करण्यात आले होते, पण 2016-17 साठी NACO ला 1700 करोड देण्यात आले आणि 2017-18 साठी 2000 करोड निधी देण्यात आला आहे.

अश्या संस्था ज्या स्वतः निधी उभा करू शकतात जसे कि The Council of Scientific and Industrial Research (CSIR) अश्या संस्थेचा फंड कमी केला आहे, आणि त्याना प्रोजेक्ट्स साठीचा अर्धा निधी स्वतः मिळवायला सांगितले आहे. बाहेरून फंड आणि ग्रांट मिळवण्यासाठी त्यांना वरिष्ठ मदत करतीलच असेही सांगितले आहे. लॅब चा वापर कमर्शिअल करून त्यातून फंड उभा करून त्यांनी स्वावलंबी धोरण स्वीकारावे. अश्या कामासाठी आम्ही कुठलेही टार्गेट्स त्या संस्थांना देणार नाही. सोबत महिन्याला रिपोर्ट कार्ड सादर करायला सांगितले आहे ज्यामध्ये ते अश्या सरकारी रेसोर्सेस चा कसा वापर करतील, त्याचा कसा उपयोग होणार आहे याची माहिती देण्यास सांगितले आहे.
आकडेवारीत मला कुठेच निधी कपात वाटत नाही, एकूणच मला या बाबतीत सरकारचे धोरण आणि त्यांचे मुद्दे रास्त वाटत आहे.

आमच्या कंपनीचे उदाहरण देतो, आमची प्रायव्हेट कंपनी आहे, आम्ही नॅनो आणि मायक्रो डीव्हाइस फॅब्रिकेट करतो. त्यासाठी आम्ही indian institute of science (iisc) bangalore या संस्थेची लॅब वापरतो , त्यासाठी आम्ही लाखो रुपयाचे बिल भरतो, हि प्रोसेस फक्त 6-7 दिवसाची असते. iiscला लॅब वापरायला देणे हे सोडून काहीच करावे लागत नाही, सगळी कामे आमचे फॅब्रिकेशन इंजिनिर करतात. अश्या अनेक प्रायव्हेट कंपनी आहेत ज्याना अश्या लॅब्स ची गरज असते. अश्या मिळणाऱ्या निधीतून हि संस्था त्यांचे संशोधन निधी गरज भागवू शकते. फक्त सरकारी निधीवर अश्या संस्था किती दिवस टिकतील? यांना कमर्शिअलाइज होणे गरजेचेच आहे.

दुसरे उदाहरण आपल्यासमोर इस्रो चे आहेच, बाहेरील देशांच्या सॅटेलाइट प्रोजेक्ट्स मुळे यांना चांगला निधी उपलब्ध होत आहेच. माझ्या बघण्यात असे अनेक प्रोजेक्ट आहेत जे एक्सटेन्शन मिळवून तेच काम कमी अधिक फरकाने करत राहतात आणि नंतर प्रोजेक्ट बंद करून टाकतात. जो पर्यंत निधी मिळतोय तो पर्यंत काम चालू. अर्थात सर्वच प्रोजेक्ट असे नसतात.

सरकार कडून अश्या प्रोजेक्ट्स ला निधी मिळावा म्हणून एखादा प्रोफेसर किंवा डिपार्टमेंटची लॉबी मोठ्या प्रमाणावर काम करत असते. काही प्रोजेक्ट्स फक्त प्रोफेसरच्या नावावर मंजुर होतात. अश्या सरकारी संस्था , त्याने काम, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यातील अंतर्गत राजकारण खूपच वाईट पद्धतीने सुरु असते. अश्या संशोधन करणाऱ्या संस्थाना प्रोफेशनल, कमर्शिअल होण्याची गरजच आहे हे मलाही मान्य आहे.

(२०१३-१४ च्या बजेट सोबत आताच्या २०१७-१८ बजेटमधील आकड्याचा फरक पाहायचा असेल खालील लिंक वर तपासा :
http://www.thehindu.com/business/Economy/budget-201314-highlights/article4461680.ece  )

Sunday, June 25, 2017

कॉफीतून निर्माण झालेलं अवाढव्य उद्योग साम्राज्य : कहाणी स्टारबक्सच्या उत्पत्तीची!



 व्यवसायात चढ उतार येतच असतो. पण एक वेळ अशी येते कि त्या वेळी तुम्ही जो निर्णय घ्याल तो निर्णय तुमच आयुष्य बदलून टाकतो. याला आपण कधी कधी “नशीबाने दार ठोठावणे” असे हि म्हणतो. कधी कधी नशीब पण एखाद्याला भरभरून द्यायला येतं, पण त्याच्याकडे घ्यायला काहीच नसतं, तर दुसरीकडे तुम्ही एक वडापावची अपेक्षा करावी आणि नशिबाने प्रसन्न होऊन 8-10 बालुशे फेकून मारावे अशी अवस्था असते. आज तुम्हाला एका सत्य घटनेवर आधारित अशीच एक स्टोरी सांगतो. कॉफिचा कप घेऊन आराम खुर्चीत किंवा गॅलरीमध्ये बसून ह्या स्टोरी चा आस्वाद घ्या!

हि स्टोरी आहे एका यशस्वी व्यावसायिकाची. व्यवसायामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, एक प्रकार असतो तो म्हणजे 'जे आहे त्यात समाधान मानून जगायचं, जास्तीची अपेक्षा करायची नाही (थोडक्यात रिस्क घ्यायची नाही)' आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे 'सतत नवीन काहीतरी करायचं, वेगळ्या वाटा धुंडाळत रहायचं, धडपडायचं रहायचं. (थोडक्यात रिस्क घेणारे)'. ह्या स्टोरीचे अशीच दोन पात्रे आहेत. हि स्टोरी आहे हावर्ड शुल्ज़ आणि गार्डन बॉकर, जेरी बोल्डवीन, आणि जेव सीग यांची. हि स्टोरी आहे स्टारबक्सच्या उत्पत्तीची आणि कॉफी साम्राज्याची.

1953 मध्ये हावर्ड शुल्ज़ हा न्यूयॉर्क मधील ब्रूकलीन भागात एका गरीब ज्यू कुटुबांत जन्माला आला. घरची परस्थिती गरिबीची असल्याने लहान वयातच तो पेपर टाकणे, हॉटेलमध्ये काम करणे अशी छोटी मोठी कामे करत असत. फूटबॉल चांगले खेळायचा, स्पोर्ट्स मुळे स्कॉलरशीप मिळाली आणि त्याच्यासाठी उच्च शिक्षणाची दरवाजे उघडी झाली. घराण्याच्या इतिहासातील एकमेव ग्रेजुएट असा हा हावर्ड शुल्ज़ 1975 मध्ये "झेरॉक्स " ह्या कंपनीत कामाला लागला. 

 या कंपनीत सेल्स आणि मार्केटिंग चे त्याने 4 वर्ष काम केले. याच दरम्यान त्याचं शौरी नावाच्या मुलीशी लग्न हि झालं होतं. त्यानंतर हावर्ड ने झेरॉक्स कंपनी सोडून "हैमरप्लास्ट" ह्या स्वीडिश कंपनीत जॉबला लागला होता. हि कंपनी स्वयंपाक घरातील उपकरणे बनवत असत. इथं मेहनतीने नोकरी करत तो अल्प कालावधीत अमेरिका प्रभाग प्रमुख झाला.मस्त अशी मोठी नोकरी, रग्गड पैसा, प्रेमळ पत्नी आणि एक सुखी आयुष्य या शिवाय एखाद्याला आणि काय हवं असतं? पण हावर्डची यशोगाथा इथंच थांबली नाही. आता तर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळणाऱ्या वळणावर तो येऊन पोहचला होता. 

सीएटल स्थित एक छोटी "स्टारबक्स कॉफी, टी अँड स्पाइस कंपनी" हि हैमारप्लास्ट कंपनीकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कोन फिल्टर्स विकत घेतं असत. हि कंपनी नक्की एवढ्या फिल्टर्स चं करते तरी काय हे बघायला ते एकदा स्टारबक्स ह्या कंपनीत उत्सुकतेपोटी सीएटल गेला.
1971 ला सुरु झालेली स्टारबक्स हि दहा वर्ष्याची छोटी कंपनी होती. हि फक्त सीएटल राज्यात आपला व्यवसाय करत असत. तीन मित्र म्हणजे लेखक गार्डन बॉकर, इंग्रजी शिक्षक जेरी बोल्डवीन, आणि इतिहास शिक्षक जेव सीगी यांनी ह्या स्टारबक्स ची स्थापना केली होती. त्यावेळी हि कंपनी फक्त कॉफीच्या बी(Bean's) विकायची . 

हावर्ड ला हि कंपनी बघताच क्षणी आवडली. काही दिवसात संस्थापक सोबत ओळखी झाल्यानंतर हावर्ड ने स्टारबक्स मध्ये नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखवली, स्टारबक्सचे संस्थापक सुद्धा नोकरी देण्याकरीता राजी झाले आणि अश्याप्रकारे हावर्ड स्टारबक्सचा रिटेलचा डायरेक्टर हि झाला. हावर्ड ने स्टारबक्स मध्ये जबरदस्त अशी कामगिरी सुरु केली. 

1983 मध्ये कंपनीच्या कामानिमित्त हावर्ड मिलान (इटली )येथे गेला होता, तिथे त्याने पहिल्यांदा "कॉफी बार" पहिला, आणि तो व्यवसाय पाहून त्याला स्टारबक्समध्ये हि अशी कॉफी ड्रिंक देता येणं शक्य आहे का याची पडताळणी सुरु केली. असे कॅफेबार फक्त कॉफी पिण्याचे ठिकाण नसून लोक एकत्र येऊन गप्पा मारतात, एकमेकांना भेटतात. अमेरिका मध्ये अश्या पद्धतीची कॅफेबार चेन व्यवसाय कोणाचाच नव्हता. हार्वडला ह्या मध्ये मोठा व्यवसाय दिसत होता. स्टारबक्स आतापर्यंत केवळ कॉफी बी विकत होती, त्यातच जर छोटासा कॉफी बार सुरु केला तर कंपनी मोठी कामगिरी करेल अशी त्याची मनीषा होती.

अमेरिकेला पोहचताच त्याने कॉफी बार काढण्याची कल्पना संस्थापकांना सांगितली. ह्या कल्पनेवर संस्थापक एवढे खुश नव्हते, त्यांचं म्हणणं होतं की स्टारबक्स एक कॉफी बी विकणारी कंपनीचं राहू द्यावी पण हावर्ड च्या प्रबळ इच्छेपुढे त्यांनी एका शॉप मध्ये कॉफी ड्रिंक बार सुरु करण्याची परवानगी दिली. हळू हळू स्टारबक्स ची कॉफी लोकांना आवडू लागली, काही दिवसातच शेकडो लोक कॉफीसाठी स्टारबक्स ला भेट देऊ लागली. हावर्ड च्या अपेक्षेनुसार त्याला ह्या व्यवसायात मोठी बाजारपेठ दिसू लागली, पण एवढं होऊन हि स्टारबक्स च्या संस्थापकांच हेच म्हणणं होतं की स्टारबक्स हि एक कॉफी बी विकणारी कंपनी राहू द्यावी. उगाच मोठी कंपनी करून डोक्याला ताप करून घायला नको, आहे तो व्यवसाय ठीक आहे. कॉफी ड्रिंक्स बंद करायला हवं. 

हावर्ड ला कॉफी ड्रिंक बारचा व्यवसाय खुणावत होता, त्याने लागलीच स्टारबक्स ला राजीनामा दिला आणि स्वतःची "टू गिओरनॅल " अशी कॉफी ड्रिंक ची चेन बार सुरु केली. हा कॉफी बार खूपच लोकप्रिय झाला. पुढे 1987 मध्ये स्टारबक्स चे संस्थापक त्यांची कंपनी विकत आहेत अशी खबर हावर्ड ला मिळाली, मग त्यानेच पुढे चक्रे फिरवली आणि स्टारबक्स विकत घेतली. ह्या काळात स्टारबक्सची 11 स्टोअर्स होती आणि हावर्डची स्वतःची 6 स्टोअर्स अशी एकूण 17 कॉफी स्टोअर्स त्याच्याकडे होतीत.
हावर्ड म्हणयचा कि " आम्ही फक्त कॉफी विकत नाही, आम्ही अनुभव विकतो, असा अनुभव कि लोक स्टारबक्समध्ये सारखे सारखे येतील."
लोकांना आरामदायी कित्येक तास बसून तिथे कॉफी घेत गप्पा गोष्टी करता याव्यात म्हणून कॅफेची रचना हि त्याने तशी बनवली होती. 

लोकांच्या समक्ष कॉफी बी रोस्ट करून कॉफी बनवून देऊ लागला, कॉफी बनवण्याची पद्धत एकसारखी ठेऊ लागला ज्यामुळे लोकांना नेहमी त्यांची मन पसंद कॉफी मिळू लागली. स्टारबक्स मधील कर्मचाऱ्यांना तो पार्टनर्स बोलायचा, त्याने सर्व कर्मचाऱ्यांचे हेल्थ इन्शुरन्स काढून दिले होते. स्टारबक्स दर वर्षी जवळपास 30 करोड डॉलर्स हे फक्त कर्मचाऱ्यांच्या हेल्थ इन्शुरन्स वर खर्च करते. हा खर्च त्यांच्या मुख्य रॉ मटेरियल कॉफी बी वर केले गेलेल्या खर्च पेक्षा कित्येक जास्ती आहे. 1992 मध्ये स्टारबक्स चा IPO आणला गेला आणि हि कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली तिथून ह्या कंपनीने मागे वळून पाहिले नाही.

पुढच्या 8 वर्ष्यात त्यांनी शेकडो कॅफे सुरु केले, दर वर्षी नवीन मार्केट, नवीन देशात त्यांनी आपला व्यापार वाढवला. 1992 मध्ये स्टारबक्स चे 165 कॅफे होती, तेच 1999 मध्ये कॅफेची संख्या 2498 झाली होती यावरून तुम्ही कंपनीचा विस्तार कसा झपाट्याने होत गेला याचा अंदाज बांधू शकता. 2000 साली जेव्हा कंपनीचे 3500 कॅफे झालीत तेव्हा हावर्ड ने रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला आणि "ओरिम स्मिथ" याला कंपनीचा ceo बनवून सगळी जबाबदारी त्याच्याकडे सोपवून स्वतः चेअरमन झाला आणि इथेच त्याने चूक केली.

हावर्ड बाजूला झाला तसा कंपनी आपल्या मुख्य उद्दिष्टापासून दूर जाऊ लागली. शेअर मार्केट मध्ये अग्रेसर होण्याच्या दृष्टीने दरवर्षी कॅफेची संख्या तर वाढू लागली पण कॉफी ची गुणवत्ता आणि ग्राहकांची सेवेची गुणवत्ता ढासळू लागली. नुकसान होण्याची कल्पना असून सुद्धा नवीन कॅफे उघडण्यात आलीत, कंपनीने कॉफी सोबतच खाद्य पदार्थाच्या सेगमेन्टमध्ये शिरकाव केला, सोबत म्यूजिक सीडी सेगमेन्ट हि सुरु केला जो कि त्यांच्या व्यवसायाच्या पूर्णतः वेगळा व्यवसाय होता , यामुळे कंपनीच लक्ष मुख्य उद्दीष्टा पासून दूर होत गेलं.
याच काळात टेक्नॉलॉजि वाढली, सोशल मीडिया झपाट्याने वाढला, प्रतिस्पर्धी वाढत गेले त्यामुळे कंपनीचा व्यवसाय मार्जिन कमी होत गेला.


2007 मध्ये स्टारबक्स कंपनीचे 15000 कॅफे असून सुद्धा या कंपनीचे आर्थिक आकडे गडगडायला लागले, आणि असे वाटू लागले की आता ही कंपनी बुडीत निघणार, बंद पडणार. तेव्हा हावर्ड ने क्रांतिकारक निर्णय घेतला आणि 2008 मध्ये कंपनीच्या ceo पदावर पुनरागमन केलं. पदभार स्वीकारल्या बरोबरच त्याने झटपट निर्णय घ्यायला सुरुवात केली. सर्वात पहिला त्याने 10,000 स्टोअर्स मॅनेजर लोकांना एका ठिकाणी मीटिंग ला बोलावून ग्राहकांना उत्कृष्ट सेवा कशी द्यायची याचे प्रशिक्षण दिले. त्याने स्टारबक्स चे उद्धिष्ट, उच्च गुणवत्तेची कॉफी, आणि ग्राहकांची सेवा यावर लक्ष्य केंद्रित करण्यावर भर देण्यास सांगून कर्मचार्यांच्यात आत्मविश्वास भरला.
त्या नंतर हावर्ड ने तोट्यात चालणारी 600 कॅफे लगेचच बंद करून टाकली. सोबत इतर कॅफेत नवीन लॅपटॉपस्, अद्यावत उपकरणे लावून घेतली. एवढेच नाही तर त्याने जगभरातील स्टारबक्स च्या सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित तीन तास कॅफे बंद ठेऊन, परफेक्ट कॉफी कशी बनवायची याचे प्रशिक्षण दिले. हे खूपच अद्भुत होतं कारण एवढा वेळ कॅफे बंध करणे म्हणजे 3 तास लेबर कॉस्ट कमी होणे जे कि कित्येक लाख डॉलर चे नुकसान होतं. हावर्ड ने कॉफी चे काही नवीन फ्लेवर्स आणून मार्केट वर आपली पकड मजबूत केली. आणि अश्याप्रकारे जी कंपनी बुडत होती तिला त्याने पुन्हा जिवंत आणि यशस्वी करून दाखवली.

आज जवळपास 72 देशात ,2 लाख 38 हजार कर्मचारी आणि 24 हजार कॅफे सोबत हावर्डच्या नेतृत्वात हि कंपनी यशस्वीरीत्या सुरु आहे. कंपनीचं रेव्हेन्यू तब्बल 2 हजार करोडच्या जवळपास आहे. भारतात टाटा समूहासोबत स्टारबक्स कंपनीने करार करून भागीदारीमध्ये स्टारबक्स कॅफे देशभर सुरु केले आहेत.
काळासोबत कंपनीने स्वतःमध्ये बरेचसे बदल केलेले आहेत. 

इथं सांगायचा मुद्दा हा आहे की जर तुम्ही व्यवसायाबद्दल passionate असाल आणि संधी ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घेतले तर तुम्हाला यशस्वी होण्यावाचून कोणीही अडवू शकत नाही, स्वतःही नाही, मग तो व्यवसाय कॉफीचा असो, मसाल्याचा असो किंवा कोणताही छोटा मोठा असो.
                                                         
-नि . मा

Thursday, May 11, 2017

खगोलशास्त्र भीती आणि आवड

खगोलशास्त्र भीती आणि आवड


आपण भारतीय एका महान संस्कृतीचे वारसदार आहोत हे मान्य जरी केले तरी त्यातील कितीतरी चुकीच्या गोष्टी आपण डोळे झाकून फॉलो करतं असतो हे हि मान्य करायला हवं .

खगोलशास्त्राबद्दल माझं असंच अनुमान आहे, आम्हाला जास्तीत जास्त खगोलशास्त्र कशातून माहिती होतं तर ते ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र इत्यादि शास्त्राच्या माध्यमातून. मी जर डॉ. चंद्रशेखर, डॉ जयंत नारळीकर, डॉ नितीन शिंदे यांना वाचले नसते तर मीही खगोलशास्त्र, वैज्ञानिक चष्म्यातून कधीच पहिले नसते. या लोकांच्यामुळे आज मी विश्वाची सफर त्यांच्या लेखणीतून करतोय.

आपला कलच तसा असतो, बघाना, गॅलिलिओ ने 1609 मध्ये दुर्भिणीतून चंद्र, शुक्र, गुरु, सूर्य या ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण केले होते, पण आज 21व्या शतकात तंत्रज्ञान असूनही आपल्यापैकी किती लोकांनी असं दुर्भिणीतून खगोलीय आविष्कार पहिले आहेत? बोटावर मोजण्याइतपत ! इथं आवड तरी कोणालाय म्हणा?
अथांग पसरलेल्या आंतरिक विश्वाच्या पसाऱ्यात आपण मानव खूपच नगण्य आहोत तरीही ग्रह आमच्या आयुष्यावर परिणाम करतात अशी आपली श्रद्धा आहे.

शिकल्या सवरलेल्या लोकांना अजून हि लग्न करायला 36 गुण जुळवायला लागतात. संकष्टी आजही आम्ही चंद्र बघूनच सोडतो, नशीब समजा आपण गुरु ग्रहावर नाही, कारण गुरु ग्रहाला 63 चंद्र आहेत, आपल्या पृथ्वी ला एक चंद्र आहे तर आपण महिन्यातून एकच संकष्टी करतो, गुरु वर असतो तर महिन्याला 63 संकष्टया करायला लागल्या असत्या, म्हणजे दिवसातून दोन उपवास, बापरे! उपवास करणाऱ्या लोकांचं काय झालं असतं ते चंद्रच जाणे !!

सूर्यमालेत सर्वात तेजस्वी असलेला शुक्र ग्रह आम्हाला "शुक्र तारा मंद वारा " किंवा "उगवली शुक्राची चांदणी " या अश्या फिल्मी गाण्यातून जास्ती समजतो.

उघड्या डोळ्यांनी रात्री दिसणाऱ्या शनी ग्रहाला आम्ही वाकड्या नजरेचा ग्रह मानतो. पाण्यापेक्षा हलका असलेला हा ग्रह (पाण्याची घनता 1 gm/cm3 आणि शनीची 0.7 gm/cm3 आहे) आज भल्या भल्यांच्या तोंडचं पाणी पळवतो. एकतर 12 राशीपैकी 3 राशींना साडेसाती लावतो म्हणजे भारतातील 25%लोकांना शनी साडेसाती लागलेली असतेच (हे फक्त भारतीयांना बरका !इतर लोकांना असले मंगळ बिंगळ काही नाही).

अभिषेक आणि ऐश्वर्यासारख्या शिकलेल्या किंवा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांनी कडक मंगल चा सॉफ्ट मंगळ करून लग्न केलं, तिथं आम्ही तुम्ही म्हणजे काहीच नाही.

ज्योतिषानी बदनाम केलेला तांबड्या रंगाचा मंगळ हा एकमेव ग्रहच भविष्यात आपल्याला राहण्याचा आसरा असणार आहे. भविष्यात जर ग्लोबल वार्मिंग, बायो-न्यूक्लिअर युद्ध किंवा पृथ्वीवरील लोकसंख्या वाढलीच तर पहिली धाव मंगळावर करण्याच्या तयारीत असलेलो आपण मात्र पत्रिकेत जरी मंगळ आला की पहिली धाव ज्योतिष्याकडे घेतो.
त्या बिचाऱ्या मंगळाला साडेसात कोटी किलोमीटर एवढ्या अंतरावरून माहित हि नसेल कि त्याची शांती महाराष्ट्रातल्या अमुक गावातील तमुक जोतिष्याने घातलेली आहे !! त्याला हे हि माहित नसते कि त्याची आणि शनीची परस्पर युती घडवून मंगळ शांतही करता येतो , आहे की नाय कमाल !!

राहू केतूला तर आम्ही अमरीश पुरी आणि शक्ती कपूरच समजतो. कालसर्प योग्य म्हणजे महाभयंकर योग. राहू ते केतू असा मोठा साप समजून राहू हे सापाचे तोंड, तर केतू हे त्याचे शेपूट. पत्रिकेतील सर्व ग्रह राहू केतूंच्या एका बाजूला आले तर काल सर्प योग्य. यावर उपाय काय तर नारायण नाग बळी! म्हणजे काट्याने काटा काढणे. च्यायला त्या सापांना सुद्धा माहित नाही कि ते इतके पॉवर फुल्ल आहेत.

अधिक मासाचे खूळ हि असेच, आम्हाला जगासोबत बरोबर येण्यासाठी वर्ष्याला 11 दिवस कमी पडले म्हणून तीन वर्षाने 33 दिवसांची वाढ म्हणजे एक महिना पंचांग वाढवण्यात आले. आता हे नाकारावे तर समस्त जावई लोकांशी वाण नाकारण्यावरून मला शत्रुत्व घ्यावे लागेल.

पृथ्वी स्वतः भोवती फिरते हे सत्य विज्ञान आपल्याला तीसरीपासून सांगतेय तरी आम्ही वास्तू पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण बघून बांधतोय. म्हणजे 24 तासात आपले किचन, बेडरूम, देवघर, टॉयलेट सगळं 24 तासात स्वतः भोवती एक फेरी पूर्ण करतात, मग काय उपयोग आहे दिशा पाहून बांधकाम करायची? तरी ही आपण बांधलेली घरे फोडून परत वास्तुशात्राच्या नियमाने दुरुस्त करत सुटलोय, किती अडाणीपणा हा.

आपण अजून किती आणि कुठवर अश्या अंधश्रद्धा जोपासणार आहोत हे माहित नाही. इथं शिकलेले हि तिथेच आणि अशिक्षित पण तिथेच आहेत.

एका वाचनात आले होते, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला, इंग्रजांनी स्वातंत्र्य जाहीर केल्यावर 14 ऑगस्ट 1947 रोजी रात्री 12 वाजता नेहरू ते स्वीकारणार होते पण भारताने रात्री 12 वाजता स्वातंत्र्य स्वीकारू नये असं धर्मपंडितांचे मत होते. का तर त्या दिवशी आमावस्या होती. त्यावर नेहरू म्हणले होते आज स्वातंत्र्य स्वीकारले नाही तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांच्या हौतात्म्याशी हि प्रतारणा ठरेल. हुतात्मे अमावस्या बघून झालेले नाही, काहीही असो, स्वातंत्र्य रात्री 12 वाजता स्वीकारले जाईल.आणि त्यांनी तसेच केले.
एवढा वैज्ञानिक दृष्टीकोन आपण ठेवला असता तर.... !!

असो!! नेहरूंनी हा दृष्टिकोन ठेवला हेही नसे थोडकेच!
 
-नि.मा

Sunday, April 30, 2017

महात्मा बसवेश्वर यांच्या ९१२ व्या जयंती



आपल्या भारताचा इतिहास तसा खूपच रंजक आणि गौरवशाही राहिलेला आहे. अश्या इतिहासात अनेक समाजसुधारक, युगपुरुष होऊन गेले. अश्या महापुरुषांची आजही ह्या जगाला गरज भासत राहते कारण त्यांनी केलेले कार्य हे सहज नव्हते, आज ही भले भले त्यांच्या सारखं कार्य करू शकत नाहीत, असेच एक महापुरुष ९०० वर्षांपूर्वी होऊन गेले ते म्हणजे विश्वगुरु जगतज्योति महात्मा बसवेश्वर. आज त्यांची ९१२ वी जयंती…त्यानिमित्त थोडक्यात त्यांच्या कार्याचा परिचय.

१२व्या शतकामध्ये भारतीय समाज विशेष करून दक्षिण भागातील समाज हा अनेक परंपरा, रूढी, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्त्री दास्यत्व, जातीयता इत्यादींनी त्रस्त झालेला, मरगळलेला होता. अशा परिस्थितीत त्या काळात समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे धाडस महात्मा बसवेश्वरांनी केले. मान, अपमान, कष्ट, टीका सहन करीत त्यांनी प्रस्थापितां विरुद्ध मोठा संघर्ष उभा केला. यासाठीच बरेचजण त्यांना १२व्या शतकातील पुरोगामी तर काहीजण विद्रोही महात्मा असेही म्हणतात.
महात्मा बसवेश्वर हे १२ व्या शतकातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष, एक महान तत्त्वज्ञानी, समाजप्रबोधक, प्रसिद्ध कवी आणि लिंगायत धर्म संस्थापक होते. महात्मा बसवेश्वरांनी जातीपातींच्या भिंती गाडून तत्कालीन समाजव्यवस्थेला एक वेगळीच ओळख दिली होती. त्यांनी शोषणविरोधी, भेदभावविरोधी, जातीभेदाविरोधी, श्रेष्ठ-कनिष्ठ विरोधी समतेची लढाई नुसती लढली नाही तर ती यशस्वी करून दाखवली. महात्मा बसवेश्वरांनी चातुवर्णाला विरोध केला. वर्णभेद, जातीभेद नुसतेच नाकारले नाही तर त्यावर त्यांनी सडकून टीकाही केली.

महात्मा बसवेश्वर यांचा जन्म ११०५ मध्ये बागेवाडी (जि. विजापूर) कर्नाटक येथे वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाला.  (जन्म तारीख आणि वर्ष या विषयी मतभेद आहेत पण खूप संशोधना अंती इतिहास संशोधक डॉ पी बी सावंत यांनी ११०५ हेच वर्ष ठरवले आहे)
दरसाल त्याच दिवशी देशभरात बसवजयंती साजरी केली जाते, खास करून कुडलसंगम (कर्नाटक), कपिलाधार, बसव कल्याण (कर्नाटक) येथे ही जयंती जोरदार साजरी केली जाते. १९१३ मध्ये कर्नाटक गांधी म्हणून ओळखले जाणारे हर्डेकर मंजप्पा यांनी दावणगेरे (कर्नाटक) येथे पहिली सार्वजनिक बसव जयंती साजरी केली.
महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील गरिबी, विषमता दूर करून आर्थिक समृद्धता निर्माण करण्यासाठी त्यांनी समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.

मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना हे त्यांच्या कायक वे कैलास सिद्धांताचे सार होय. शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे.
श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी (दासोह ) मांडल्यामुळे बसवेश्र्वरांची वृत्ती समाजवादी, समतावादी होती, असे दिसून येते. दासोह सिद्धांतात आपण कमावलेले धन केवळ स्वतः पूरते न वापरता त्याचा समाजासाठी उपयोग करण्याची संकल्पना त्यांनी मांडली.

बसवेश्र्वरांच्या उपदेशामुळे वेगवेगळ्या व्यवसायांना, विशेषतः ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला.

बसवेश्वरांच्या काळात समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र, बहिष्कृत समजले जात असे. स्त्रीयांवर अन्याय होत होता, म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी मोठे भरीव कार्य केले. स्त्रियांना मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक हक्क दिले. स्त्रियांची अशुद्धतेच्या कल्पनेतून आणि पंचसुतका पासून सुटका केली.
तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह महात्मा बसवेश्वरांच्या पुढाकाराने १२ व्या शतकात घडला. मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला.
असा आंतरजातीय विवाह तो ही १२ व्या शतकात हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसी होतं कारण आजही म्हणजे ९०० वर्षांनंतरही आपल्या समाजाची असा विवाह स्वीकारण्याची पूर्ण मानसिकता झालेली नाही.

सवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. हे त्या काळातील पहिले लोकशाहीचे संसद होते. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे. तत्कालीन शिवशरण-शरणींची अशी वचने पुढे संग्रहीत करण्यात आली. मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. वचन साहित्यातून त्यांनी समाजात प्रबोधनरूपी विचार पेरले.


दोन वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लंडन मध्ये थेम्स नदीच्या काठी बसवण्यात आलेल्या बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरन संध्येच्या भाषणात याच गुणांचा जगासमोर जाहीर गौरवही केला होता.
 आता परत हे मूळ कन्नड भाषेतील वचन साहित्या नुकतेच २३ भाषेत रूपांतरित झालेलं असून येत्या २८ एप्रिल २०१७ रोजी बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे “वचन साहित्य” देशाला समर्पित करण्यात येत आहे.

 -नि. मा. 

Sunday, April 9, 2017

"ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटतं "


"ऊन जरा जास्तच आहे, दरवर्षी वाटतं "

 



 दरवर्षी जसजसा एप्रिल-मे जवळ येतो तेव्हा उन्हाळा जरा जास्तीच आहे असं सगळ्यांनाच वाटतं. हिवाळ्यात हवा हवा असणारा सूर्य मात्र उन्हाळ्यात नको नको वाटतो, आमच्या काही फेसबुक मित्रांनी उन्हाळाचं रद्द व्हावा अशीही गमतीने मागणी केली होती.

अभ्यासायला सूर्य तसा खूप छान तारा आहे, मला जाम आकर्षण आहे याच, युनिव्हर्स मध्ये अद्भुत आहे, सर्वांनाच माहित आहे, सूर्य आहे म्हणून तर पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे.
या उन्हाची गम्मत सांगतो आज ह्या क्षणाला जो उन्हाचा चटका लागतोय, जो प्रकाश , उष्णता आपल्याला मिळतेय त्याची उत्पत्ती हि लाखो वर्ष्यापूर्वी झालेली असते.

सूर्याच्या मध्य केंद्रभागेत निर्माण होणारी ऊर्जा 'प्रकाश आणि उष्मा ' याच्या रूपाने बाहेर पडते (याला फोटॉन म्हणतात). सूर्य एवढा मोठा आहे की ही ऊर्जा बाहेर पृष्ठभागावर यायला तब्बल 1लाख 70हजार एवढे वर्षे लागतात.

सूर्याच्या विशालतेची अजून एक गोष्ट सांगतो, आपण मानवाने आतापर्यंत ऊर्जेसाठी जो मोठा प्रकल्प बांधलाय त्यातून आपण फक्त 22 हजार 500 मेगावॉट ऊर्जा निर्मिती करू शकतोय.
सूर्याची ऊर्जा किती आहे माहीत आहे का? 38 हजार करोड मेगावॉट तेही प्रति सेकंदाला सूर्य निर्माण करतोय   म्हणजे सूर्य  किती विशाल ऊर्जा निर्माण करतो ते पहा , आपल्याला हे सर्व फुकट देतोय सूर्य.

पण हा सूर्य खूप काळ असंच ऊर्जा देत राहील का? सूर्य काय आहे, कसा आहे , त्याचे आयुष्य किती आहे? हे हि आपण पाहू.
शास्त्रज्ञ असं सांगतात की सूर्याचा जन्म 4.5 अरब वर्ष्यापूर्वी झालाय. सूर्य हा हायड्रोजन आणि हेलियम यापासून बनलेला मोठा गोळा आहे. याचे बाह्य आवरण हे हायड्रोजन, हेलियम, लोह, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कॅल्शियम, क्रोमियम या तत्वांपासून बनलेलं आहे
सूर्याचं मध्यकेंद्रिय (core) तापमान 1 करोड 56 लाख ℃ आहे आणि बाह्य आवरणाचे तापमान 6000℃ आहे .
शास्त्रज्ञ काही वर्ष्यापूर्वी असं मानत होते की, सूर्य सामान्य इंधना सारखं जळत राहतोय, पण मग त्यांना एक प्रश्न पडायचा कि हे असं असेल तर इंधन संपत का नाही? 1920 मध्ये ह्यावर अजून अभ्यास केल्यावर त्यांना कळालं कि हि एक Nuclear Fusion प्रोसेस आहे. या nuclear fusion वर सध्या जोरात काम चालू आहे, हे काम यशस्वी झालं की मानव जातीला कधी न संपणार्या इंधनाचा स्रोत मिळेल. सध्या युरोप, चीन, जपान, रशिया, अमेरिका आणि भारत हे संयुक्तिकपणे यावर काम करत आहेत.
( हि तीच प्रोसेस आहे ज्याच्या आधारे हायड्रोजन बॉम्बचं  काम चालतं) .

सूर्याच्या मध्यभागी हायड्रोजन कण प्रचंड दबावाखाली असतात. यां कणांची एकमेकांशी टक्कर होऊन हेलियम जन्माला येते. म्हणजे प्रत्येक सेकंदाला 6570लाख टन हायड्रोजनच6530लाख टन हेलियम मध्ये रूपांतर होतं , या प्रोसेस मध्ये जवळ पास 40 लाख टन हायड्रोजनच रूपांतर होतच नाही, त्याच रूपांतर ऊर्जेत होत. हीच ऊर्जा अवकाशात चारीबाजूला पसरली जाते.


संशोधक असं सांगतात की ही सूर्याची प्रोसेस अजून 5 अरब वर्ष चालेल, त्यानंतर सुर्यामधील हायड्रोजन समाप्त होईल, त्यामुळे कोअर तापमान प्रचंड वाढेल ,यामुळे सूर्याचा आकार आहे या पेक्ष्या 100 पटीने वाढेल (याला red giant म्हणतात) असं झालं तर सूर्य पहिला बुध आणि शुक्र या ग्रहांना खाऊन टाकेल आणि मग त्यानंतर आपली पृथ्वी. पण तो पर्यंत आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टीचा विनाश झालेला असेल. तिथून पुढे हजारो वर्षे सूर्यात फक्त हेलियम शिल्लक राहिलेलं असेल. मग ते हेलियम कार्बन मध्ये रूपांतरित होईल, त्यामुळे सूर्याचा आकार अजून वाढेल. हे होत असताना त्याच्या बाह्य आवरणाचे तुकडे पडायला सुरुवात होऊन तो शेवटी पृथ्वी एवढा गोळा शिल्लक राहील. आता त्याची ऊर्जा एवढी असेल की ती मोजनेही शक्य नसेल. सूर्य फक्त पांढरा तारा म्हणून शिल्लक राहिल. त्याचे तापमान असेच वाढत राहून पुढे तो जळून जळून कोळश्यासारखा होईल आणि अश्या प्रकारे सूर्याचा अंत होईल.

हे लगेच होणार नाही, हे पाहायला आपण जिवंत हि नसू. हे व्हायला 5 अरब वर्ष लागतील.
सुर्यासारख्या कित्येक ताऱ्यांचा अंत झाला आहे आणि नव्याने जन्म हि झाला आहे. अवकाशात हि आरंभ आणि अंत ची क्रिया अशीच अविरतपणे चालू रहाणार आहे.

-नितीन माळी

Friday, November 25, 2016

निकोला टेस्ला एक महान वैज्ञानिक






निकोला टेस्ला 

बऱ्याच लोकांना निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाबद्दल जास्ती माहितीच नाही, फार कमी लोकांना त्याच्या अविष्काराबद्दल माहिती आहे. जे कोणी त्या बद्दल बोलतात, लिहतात ते निकोलाचा उल्लेख एक वेडा , सनकी शास्त्रज्ञ म्हणून करतात पण ते हेही मान्य करतात कि आजचे प्रगत विज्ञान आहे त्यात त्याचा मोठा वाटा आहे , तो एक खरोखरच महान असा शास्त्रज्ञ होता ,पण त्यांचे कार्य आणि प्रयोग यांचे योग्य श्रेय त्याला  मिळाले नाही. अर्थात त्याला त्याचा अव्यवहारी स्वभाव, प्रसिद्धी पासून दूर पळ काढणे, एकाकी जीवन जगणे हे कारणीभूत आहे.  आठ भाषा अवगत असलेला , २६ देशात जवळपास  ३०० च्या वर पेटंट आणि असे कित्येक अविष्कार  ज्यांचे  पेटंट घेतलेले नाही अश्या ह्या  शास्त्रज्ञा बद्दल थोडक्यात जाणून घेऊया त्याच्या कामाविषयी, वेगवेगळ्या संशोधनाविषयी आणि त्याच्या जीवनाविषयी. 

निकोला टेस्ला ह्या शास्त्रज्ञाचा जन्म  मिलुटीन टेस्ला आणि ड्यूका टेस्ला ह्या सर्बियन (सर्बियन  लोक हे दक्षिण स्लाव जमाती मध्ये मोडतात , हि जमात बाल्कन(दक्षिण-पूर्वी यूरोप) प्रदेशमध्ये आढळते) माता पित्याच्या घरी १० जुलै १८५६ मध्ये ऑस्ट्रियन (साध्याच क्रोएशिया )मध्ये झाला होता. पाच अपत्यांपैकी  निकोला हे चौथे अपत्य ! लहानपणापासूनच हुशार असलेल्या निकोलाचे प्रायमरी शिक्षण १८६२ मध्ये पूर्ण केलं.
अद्वितीय बुद्भिमत्ता असलेल्या निकोलाने सण १८७३ मध्ये चार वर्ष्याचे  शिक्षण ३ वर्ष्यातच  संपवले होते.
पुढे  १८७५ ला पॉलीटेक्नीक ला द्वितीय वर्षाला अति हुशारीपणामुळे एका शिक्षकामध्ये आणि टेस्लामध्ये मतभेद झाले आणि त्या वर्षी ते  नापास  झाले, त्यातच त्याला जुगार खेळायची सवय लागली. महिन्याला मिळणारा  भत्ता आणि ट्युशन फी त्यांनी जुगारात उडवली, अभ्यास झाला नाही , आणि ते  फायनल ला नापास झाले , त्यांचे  युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएशन अपूर्ण राहिले.
 
पुढे ते  १८८१ मध्ये अंडर कॅन्स्ट्रक्शन, असलेल्या  बुडापेस्ट मध्ये एका बुडापेस्ट टेलिफोन एक्स्चेंज कंपनीत मुख्य विद्युत अभियंता म्हणून नोकरीला लागले. इथे काम करत असताना केंद्रीय संचार उपकरणांत नवीन शोध लावून उपकरणे सुधारित केली आणि नवीन स्वरूपातला टेलिफोन एम्प्लीफायर बनवले पण त्याचे त्यांनी कधीच पेटंट घेतले नाही. 
पुढे ते   १८८२ मध्ये थॉमस अल्वा एडिसन ह्यांच्या फ्रांस मधील कॉंटिनेंटल एडिसन कंपनीत विद्युत उपकरणे डिझाइन करणे आणि improve करण्याचे काम करू लागले . पुढे १८८४ ला तेथून त्यांची बदली न्यूयॉर्क , (अमेरिका) मध्ये झाली.  या दरम्यान त्यांनी काही वेगळ्या प्रकारचे डायनमो विकिसत केले. तेव्हा त्यांना थॉमस अल्वा एडीसन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली.

 एडिसन ने टेस्ला ला त्यांचा  डायरेकट करंट जनरेटर (DC Generator )  जास्त प्रभावी करून द्यायचा प्रस्ताव ठेवला होता. एडिसन यांनी टेस्ला यांना सांगितले की जर ते या कामात यशस्वी झाले तर त्यांना ५०,००० डॉलर बक्षीस म्हणून मिळतील. टेस्ला यांनी एडिसनला हवे तसे बदल  करून दाखवले, परंतु एडिसन यांनी आपला शब्द पाळला नाही. त्यांनी टेस्ला यांची चेष्टा केली आणि पगारवाढ हि दिली नाही तेव्हा रागाने टेस्लानि एडिसन ची कंपनी  सोडली. 

एडिसन यांची कंपनी सोडल्यानंतर १८८६ मध्ये त्यांनी दोन Investors सोबत आपली स्वतःची
 Tesla Electric Light and Manufacturing  अशी कंपनी स्थापन केली. या कंपनीमध्ये त्यांनी डायनेमो इलेक्ट्रिक मशीन कम्युटेटर तयार केला. अमेरिकेतील हे त्यांचे पहिले पेटंट होते. पुढे त्यां Investors सोबत हि त्याचे पटले नाही, त्यांनी टेस्ला ला कंपनीतून बाहेर काढले. पुढची काही दिवस अगदीच हालाकीत गेली.


१८८७ च्या काळात परत नवीन Investors सोबत कंपनी स्थापना केली, इथं ते  मोटर आणि जनरेटर वर काम करू लागले होता. त्याच काळात त्यानी  Alternative Current (AC ) वर चालणारी Induction Motor बनवली होती. 
हा तोच काळ होता जिथं एडिसन चा DC Current आणि टेस्ला चा AC  Current ह्यावर मोठं व्यावसाईक युद्ध सुरु झालं. दोघेही आपापले Current कसे चांगले आणि दुसऱ्याचे कसे खराब आहे हे सिद्ध करून दाखवू  लागले,  एडिसन ने AC  Current  चे  भय उत्पन्न करण्यासाठी  चक्क एका हत्तीला लोकांच्या समोर विजेच्या शॉक देऊन मारला  आणि AC ची विनाशकारी शक्ती आहे हे लोकांना प्रात्यक्षिक दाखवल.

परंतु  AC  Current चे वैशिष्ट्य असे की याचे वोल्टेज ट्रांसफोर्मर द्वारा वाढवून खुप दूर पर्यंत पाठवता येऊ शकत होत . DC मध्ये असे करता येत नाही. त्याच बरोबर AC प्रणालीवर चालणारी उपकरणे DC उपकरणांच्या तुलनेत कमी वीज वापरतात. प्रत्येक घरात्त वीज ही केवळ AC प्रवाहानेच पोहोचू शकत होती. त्यामुळे शेवटी टेस्ला यांचाच विजय झाला.

त्या वेळी DC system प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागू होती आणि एडिसन कंपनी DC उपकरनेच बनवत होती, त्यामुळे एडिसन ने या नवीन पद्धातीला विरोध केला. टेस्ला ने उद्योगपति जॉर्ज वेस्टिंग हाउस याच्या सोबत नवीन कंपनी चालू केली. या कंपनीने AC प्रणालीचे महत्त्व जगाच्या समोर ठेवले. आज आपल्या घरी खांबा वरून जी वीज येते ती टेस्ला यांची AC प्रणाली आहे.

टेस्ला यांनी चक्रीय चुंबकीय क्षेत्राच्या सिद्धांताचा शोध लावला. त्यांचा एक आणखी महत्वपूर्ण अविष्कार म्हणजे  AC Electric Motor आहे . त्यानी ह्या मोटार च्या साह्याने नायगरा धबधब्यावर पहिले जल विद्युत पावर स्टेशन (Water electric power station) तयार केले, त्या नंतर केवळ अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगानेच AC विद्युत वितरण प्रणालीचा स्वीकार केला.

१८९१ मध्ये टेस्ला यांना अमेरिकेची न्यूट्रलाइज नागरिकत्व  मिळाले . त्याच काळात टेस्ला यांनी  wireless power transmission ने वायर विरहित अंतरावर ठेवलेले ब्लब पेटवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवले होते.
Hollywood मधील  The Prestige ह्या चित्रपटात टेस्ला ह्यांची wireless power transmission सोबत अनेक शोध दाखवले आहेत.  ह्याच काळात टेस्ला कॉईल चा शोध लागला. 


असे मानले जाते की टेस्ला यांनी  १८९४ मध्ये Invisible Energy (आताचे क्ष किरण ) किरणांचा शोध लावला होता . परंतु १८९५ ला त्यांच्या प्रयोगशाळेत लागलेल्या आगीत शेकडो संशोधन मॉडेल , डिजाईन, नोट्स , फोटोस  सर्व कागदपत्र आणि उपकरणे जाळून खाक झाले.  ह्यामागे एडिसन चा हात होता असं म्हणतात

Radio Wave शोध:
टेस्ला ने रेडियो तरंग (Radio Wave) चे ट्रान्समिशन करता येते ह्या थेअरीज १८९३ मधेच  मांडल्या होत्या. वातावरणाच्या बाहेर  रेडियो लहरी संपूर्ण जगात कोठेही पाठवता येऊ शकतात असा सिद्धांत मांडला. रेडियोत वापरत असलेला टेस्ला रॉड त्यांनीच शोध लावलेला आहे, ह्याचे सादरीकरण करताना त्यांनी Radio Wave Controller वापरून एका बोटीला चालवून दाखवले, हा विषय लोकांमध्ये खूप कुतुहूल करणारा ठरला होता, लोकांना वाटायचे हा जादू आहे, टेलिपॅथी आहे किंवा ह्या बोट मध्ये प्रशिक्षित माकड लपवले आहे. 

 पण पुढे मार्कोनी नावाच्या संशोधकाला अश्याच Radio Wave Transmission बद्दल पेटंट मिळाले, ह्यावर टेस्ला आणि मार्कोनी ह्यांच्यात पेटंट युद्ध सुरु झालं कोर्टात  खुप काळ खटला चालला पण पेटंट  मार्कोनी यांना मिळाले.  सध्या मार्कोनी याला रेडियोचा जनक मानले जात असले तरी सत्य असे आहे की या शोधात टेस्ला यांचेही तितकेच योगदान लाभले आहे.

 १८९९ ला त्यांनी Wireless Telegraphy  चा शोध लावला त्याच सोबत कृत्रिम .वीज निर्मिती सुद्धा केली.  एका प्रयोगामध्ये त्यानी लाखो वोल्ट ताकदीची आकाशातील वीज निर्माण केली.  त्या विजेची गडगडाहट एवढा मोठा होता कि २५ किलोमीटर पर्यंत लोकांना ऐकू येत होता.  ह्या प्रयोगा दरम्यान लोकांच्या मनात भीती निर्माण झाली होती. 

त्यानी  पुढे हा पण दावा केलाय कि Wireless Telegraphy प्रयोगा दरम्यान उभा केलेल्या रिसीव्हर टॉवर मधून काही अज्ञात सिग्नल मिळाले होते जे कि त्याच्या मते एखाद्या परग्रहावरून एलियन्स ने धाडले होते.

ज्या कामासाठी इन्वेस्टर्स नि पैसा लावला होता ते काम न करता टेस्ला नि दुसरेच शोध लावले होते त्यामुळे ह्या इन्वेस्टर्स  लोकांनी त्याची लॅब बंद पाडली.  

१९०६ ला ५०व्या वाढदिवसाला  त्याने ब्लेड नसलेल टर्बाईन बनवले त्याचा वापर करून त्यानी  कोलोराडो धबधब्यात  पॉवर स्टेशन बसवले.
१९१२ मध्ये ब्रेनला  इलेकट्रीक शॉक देऊन ब्रेन अधिक क्रियाशील करण्याच्या थेअरी त्यानी  मांडल्या, त्यावर काही प्रयोगही  हि केले. 
१९१७ मध्ये त्यानी आताच्या रडार प्रणाली सारखी 'इलेक्ट्रिक रे' हि  प्रणाली पाणबुडी शोध घेण्यासाठी मांडली होती पण तो त्यातील काही गोष्टीत चुकीचा ठरला.

टेस्लाने Death Ray ह्या मशीनचा शोध लावल्याचा दावा केला होता, त्याच्या दाव्यानुसार जवळपास ३००किलोमीटर दूर बॉर्डर वरून जमिनीवरून  हवेमध्ये असे काही किरणे सोडायचे  कि  त्याने शत्रूची १० हजार फूट उंचीवरील विमाने खाली पाडणे शक्य होतील .

संपूर्ण आयुष्य अविवाहित राहणाऱ्या आणि अर्ध्याहून अधिक काळ हॉटेल मध्ये जीवन जगणाऱ्या  ह्या अवलियाचा जानेवारी १९४३ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मृत्यू विषयी अनेक चर्चा, मतभेद, तर्क सुरु राहिले. काहींच्या मतानुसार त्यांचा मृत्यू हा संशयास्पद होता, त्यांच्या मृत्यू पश्चात अमेरिका सरकारने त्यांचे संशोधन आणि उपकरणे स्वतःच्या ताब्यात घेऊन सर्व सामान्य जनतेपासून लपवून ठेवली आहेत. काही  म्हणतात की त्यांचा मृत्यू हा केवळ अमेरिकन सरकारचा एक बनाव होता आणि त्यानंतर ते अनेक वर्ष गुप्तपणे अमेरिकन सरकार साठी काम करत राहिले.आज हि बरेच असं  देखील मानले जाते की टेस्ला यांचे अनेक प्रयोग अमेरिका सरकान ने लुप्त केले आहेत.


 निकोला टेस्लाच्या स्मरणार्थ अमेरिका १० जुलै हा दिवस टेस्ला दिवस म्हणून साजरा करते. टाईम मासिकाने  त्यांच्या ७५ व्या Birthday ला,  आपल्या Cover Page वर त्यांना स्थान दिले होते. या मुहूर्तावर ७० महान वैज्ञानिकांनी त्यांची प्रशंसा केली होती. ह्या कार्यक्रमाला आईनस्टाईन देखील होते. भौतिक चुंबकीय क्षेत्राला त्यांच्या नावावरून टेस्ला हे युनिट देण्यात आल. त्याच्या नावाने काही अवॉर्ड्स सुद्धा मिळतात. १९५६ मध्ये टेस्ला सोसायटीची स्थापना हि झाली.  चंद्रावर पृथ्वी पासून दूर असलेल्या एका २६ किलोमीटर व्यासाच्या क्रेटर ला टेस्ला नाव देण्यात आले आहे. एका सूक्ष्म ग्रहाचे नाव २२४४ टेस्ला ठेवण्यात आले आहे. सर्बियाच्या बेलग्रेड विमान तळाचे नाव टेस्ला आहे,  सर्बियाच्या  विद्युतगृहाचे नाव टेस्लाच्या नावावरून देण्यात आले आहे. अमेरिकेत विद्युत कार निर्माण करणाऱ्या कंपनीचे नाव टेस्ला मोटर्स आहे, त्यांच्या नावे टेस्ला पुरस्कार दिला जातो. बेलग्रेड इथे निकोला टेस्ला संग्रहालय देखील आहे. वॉशिंग्टन मध्ये त्यांच्या नावे काही शाळा, महाविद्यालये आहेत सर्बियाच्या १०० दिनारच्या नोटेवर टेस्ला यांचे चित्र आहे. नायगरा फॉल वरती टेस्ला यांचा मोठा पुतळा आहे


Sunday, November 20, 2016

आर्थिक नियोजन

 आर्थिक नियोजन


काळा पैसा आणि वाढलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी भारत सरकारने ५००  आणि १००० च्या नोटांचे विमुद्राकरण केले, आणि देशात एकच खळबळ उडाली, अशी खळबळ उडणं साहजीक होते. ह्यातून आपण काय शिकण्यासारखं आहे? अशीच आर्थिक परिस्थिती छोट्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकाच्या वैयक्त्तिक आयुष्यात उद्भवली तर काय होईल ? अश्या वेळी तारांबळ उडू नये म्हणून कोणती खबरदारी घेणे गरजेचे आहे?
ह्यावर उत्तर एकाच, आर्थिक नियोजन करणे आणि समृध्द जीवन जगणे. 

आर्थिक नियोजन करणे म्हणजे नेमके काय करणे?
  
 आपल्या गरजा, ध्येय,  उद्दिष्टे यांची कालावधीनुसार वर्गवारी करून त्यानुसार तरतुदीचे नियोजन करणे म्हणजे आर्थिक नियोजन करणे होय. 

 आर्थिक नियोजन का करावे?
प्रत्येकाच्या आयुष्यात काहींना काही चढउतार होत असतात आणि त्यामुळे आपल्यासमोर आर्थिक संकट उभे राहतं , अशी संकटे व्यवसायात , कुटुंबात येऊ शकतात जर आपले पुरेसे आर्थिक नियोजन नसेल तर आपली खूप हानी होऊ शकते, कर्जबाजारीपणा येऊ शकतो हे होऊ नये म्हणून सर्वांनी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे.   
प्रत्येकाने  स्वतःचे आर्थिक नियोजन केलेच  पाहिजे. आर्थिक नियोजन हा विषय क्लिष्ट अगदीच नकोसा वाटणारा आहे .आर्थिक नियोजन जेवढया लवकर सुरु कराल तेवढं फायद्याचं आहे. तरुणांनी  शिस्त लावून घेतल्यास पुढील काळात  ह्याचे फायदे  नक्की मिळतील . हे आर्थिक नियोजन कसं करावं, खर्च कसे मॅनेज करावेत, गुंतवणूक कुठे करावी हे आपण बघूया.

बर्याच अर्थतज्ञ्  लोकांनी आर्थिक नियोजन करताना सर्वसाधारण पणे काही महत्वाचे मुद्दे मांडले माझ्या वाचनात आले आहे ज्यावर आर्थिक नियोजन अवलंबून असते ते म्हणजे  वय, उत्पन्न,  उद्दिष्टे, जोखीम घेण्याची क्षमता, अपेक्षित रिटर्न, आणि उपलब्ध शिल्लक. आणि बरेच  आहेत पण वर दिलेली काही प्रमुख आहेत. 

आर्थिक नियोजनाची  करावयाच्या तीन पायरी संकल्पना मी मांडतोय,

  1. जीवन विमा - Life Insurance  आणि आरोग्य विमा - Health Insurance 
  2. सेविंग्स (Fund Saving ). 
  3. गुंतवणूक (Investment ) 

 आर्थिक नियोजनाची पहिली पायरी म्हणजे प्रत्येकाचा जीवन विमा - Life Insurance  आणि आरोग्य विमा - Health Insurance  असलाच  पाहिजे. विचार करा जर दुर्दैवाने एखाद्याच्या कुटुंबात कर्त्या कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झालाच तर त्या कुटुंबावर काय  संकट कोसळेल? मानसिक आधार तर जाईलच पण आर्थिक आधार पण जाईल, वाढती महागाई त्यात खाणारी २-३ तोंडे, लहान मुले असतील तर त्यांचे संगोपन , त्यांचं शिक्षण, वडीलधारी लोकांचे आजारपण, नंतर मुलांचे लग्न कसं होणार? म्हणून सर्वात आधी प्रत्येकाचा जीवन विमा आणि आरोग्य विमा असणे आजची गरज आहे.

जीवन विमा घेताना नेहमीचा जीवन विमा घेण्यापेक्षा टर्म इंश्युरन्स  घ्यावा  हा एक अतिशय सोपा व साधा प्रकार आहे. यात फिक्स असा वार्षिक कमी  हप्ता भरावा लागतो आणि विमेदाराचा मृत्यू झाला तरच त्याच्या वारसाला विम्याची एकरकमी रक्कम मिळते; ह्यात एक गोष्ट फार महत्वाची ती म्हणजे विमा संरक्षणाचा कालावधी संपल्यानंतर म्हणजेच मुदतपूर्तीनंतर कोणतीही रक्कम विमेदारास मिळत नाही.  आपलं पहिले लक्ष्य म्हणजे शुद्ध विमा असला  पाहिजे , परताव्याचा  विचार ह्या पायरीवर  करू नका.  विमा  आणि गुंतवणूक यांची  गल्लत करू नका.

जीवन विमा किती रकमेचा असावा ? 
तर साधारण आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या अंदाजे दहा पट कव्हर असावा. म्हणजे समजा ३० वर्ष वयाची व्यक्ती चे वार्षिक उत्पन्न ३ लाख आहे तर जीवन विमा ३० लाख चा असावा. त्यासाठी त्याला वार्षिक फक्त ६ हजार चा कायम स्वरूपी प्रीमियम  पडतो. 

जीवन विमा घेताना कमी वयात असताना घेतला गेला पाहिजे जेणे करून वार्षिक  प्रीमियम कमी भरावा लागतो , ज्या कंपनीचा घेताय त्याचा क्‍लेम सेटलमेंट रेशो' जास्ती असेल असाच बघून घ्यावा , दारू किंवा सिगारेट घेत असाल/ नसाल तर खरी माहिती दिली पाहिजे, आणी सर्वात महत्वाचे म्हणजे योजनेसाठी वारसदार(नॉमिनी ) ठरवलेला असला पाहिजे. विमा कितीही घेता येतो. ह्या संदर्भात माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे. 

आरोग्य विमा:
जीवन र्विम्यानंतर आरोग्य विमादेखील महत्वाचा बनत चालला आहे . ह्याचे कारण म्हणजे वाढत चाललेला रुग्णालयातील महागडा  औषधोपचार आणि नवनवीन उद्भवलेले  आजार . त्यामुळे प्रत्येकाचा आरोग्य विमा असणे गरजेचे आहे.  आपला आरोग्य विमा किमान  ४-५ लाखांचा तर असावाच. ह्या मध्ये विमा कंपनी  कुठे कुठे सुविधा देते,  कोणकोणते आजार समाविष्ट करतात, कोणते नाहीत करत, नो क्लेम चा फायदा, महिलांसाठी मॅटर्निटी सुविधा देतायेत कि नाही , आजारा  आधी आणि नंतर किती दिवसाचा खर्च स्वीकारणार, चालू आजाराचे खर्च करणार कि नाही ह्या बाबी तपासून घ्याव्यात. आरोग्य विमा एकट्यासाठी किंवा  कुटुंबासाठी एकत्रित (फ्लोटर प्लॅन ) घेता येतो.

आर्थिक नियोजनाची  दुसरी पायरी  म्हणजे पैसा साठवणूक (Savings ):

लहान  पल्ल्याच्या ध्येयांसाठी म्हणजे घर चालवण्यासाठी दैनंदिन घरखर्च, वाहन व इंधन खर्च, गृहोपयोगी वस्तूंची खरेदी, पाहुणे आले-गेले त्यांचा खर्च, एखादी सहल , पार्टी , मनोरंजन , कर्ज हप्ते किंवा विम्याचे हप्ते, ह्यासाठी ठराविक शिल्लक रक्कम मिळकतीतून बाजूला काढून साठवून ठेवली पाहिजे.
सेविंग किती करावी ? 
सेविंग करण्यासाठी विशिष्ट असा फॉर्मुला नाही , साधारण कमीत कमी १० टक्के तरी सेविंग असायलाच हवी(फक्त सेविंग, गुंतवणूक नाही ), जास्ती सेविंग करू नये, सेविंग करून उरलेले पैसे गुंतवणुकीत टाकावे.  प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे (हे एक अमेरिकन गुंतवणूकदार व उद्योगपती आहेत. बफे ह्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते) ह्यांच्या मते महिन्याला मिळणाऱ्या मिळकतीमधून सर्वात आधी सेविंग करावे,  सेविंग करून  नंतर उरलेले पैसे खर्चकामासाठी उपयोग करावे. आपण आतापर्यंत उलटे म्हणजे पहिला खर्च मग त्यातून उरले तर सेविंग असं करत आलोय जे कि चुकीचं आहे. 

सेविंग कुठे करावी? 
मासिक ठराविक रक्कम आपण बँकेत किंवा घरी  ठेवावी जेणेकरून कधीही गरजेनुसार काढता/ वापरता  येईल. काही रकमेचे रिकरिंग (RD) चालू करावे त्यातून आपण विम्याचे हप्ते  देऊ शकतो.  ह्या पायरीमध्ये आपण रकमेच्या रिटर्न्स बद्दल विचार करू नये . हि सुद्धा शुद्ध साठवणूक आहे. 

आर्थिक नियोजनाची तिसरी पायरी म्हणजे गुंतवणूक(Investment ) :
 मध्यम किंवा मोठ्या पल्ल्याच्या ध्येयांसाठी जसे घर घेणे , लग्न कार्य करणे , परदेशी सहल , चारचाकी गाडी घेणे , मुलांचे शिक्षण , वृद्धापकाळात पेन्शन ह्या गोष्टीसाठी वेगळी तरतूद असायला हवी.  सेविंग मधून वरील ध्येयं पूर्ण नाही होऊ शकत कारण सेविंग रक्कम मधून मिळणारा परतावा खुपच कमी असतो , महागाई दर वर्षी सरासरी ७% दराने वाढत असतो नुसत्या काही सेविंग ने आपली दीर्घ उद्धीष्ट्ये पूर्ण करणे शक्यच नाही म्हणून मार्केट मध्ये अश्या काही स्कीम्स आहेत ज्या मधून काही ठिकाणी जोखीम वापरून, तर  काही ठिकाणी बिनधास्त आपण गुंतवणूक करू शकतो आणि महागाई वर मात करून जास्ती रिटर्न्स मिळवून आपली ध्येयं पूर्ण  करू शकतो . 

गुंतवणूक कुठे आणि कशी करावी ?
  1.  कमी प्रमाणात बँक मुदत ठेवींचा पर्याय सुद्धा चांगला आहे. ह्यामध्ये रिस्क काहीच नाही परंतु परतावा जास्ती मिळणार नाही. ७ टक्के च्या आसपास सामान्य  रिटर्न्स मिळतील. 
  2.  काही प्रमाणात म्युच्युअल फंडच्या योजनेत गुंतवणूक करावी.  म्युचुअल फंड हे सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूकिचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातील गुंतवणूक ही शेअर बाजारात केली जाते. शेअर बाजार म्हणजे जुगार असं सरसकट मतं मांडणे चुकीचं आहे. खर म्हणजे शेअर बाजार हाच संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. शेअर बाजारात ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करण्यासाठी त्याचे नॉलेज आपल्याकडे नसते म्हणून अशांसाठी तर म्युचुअल फंड आहे . कारण म्युचुअल फंड मधील राशीचे नियोजन , व्यवस्थापन करण्यासाठी त्यांचेकडे तज्ञ मंडळी, फंड मॅनेजर असतो, इथे आपल्याला पैसे देण्या व्यतिरिक्त काहीच करायला लागत नाही , तज्ञ् टीम , फंड मॅनेजर शेअर बाजारातील घडामोडींचा  अभ्यास करून आपला पैसा योग्य ठिकाणी लावून आपल्याला चांगले रिटर्न्स मिळवून देतात. ह्यामध्ये कमी रिस्क मध्यम रिस्क आणि  जास्ती रिस्क अशी सुविधा आहे, SIP द्वारे आपण ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकता, म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात SIP  हा गुंतवणूक पर्याय छोट्या आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी अतिशय परिणामकारक ठरतो.  विशेष म्हणजे रिटर्न्स चक्रदरवाढ  (कॉमपौंडिंग ) पद्धतीने मिळते,  म्हणून म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही लॉन्ग टर्म म्हणजे १० वर्ष , १५ वर्ष, २०वर्ष  असेल  तर भरपूर फायदा मिळवता येतो.
  3. काही रक्कम आपण निवृत्तीसाठी म्हणून आताच बाजूला काढून ठेऊ शकतो, त्यासाठी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये किंवा म्युच्युअल फंड मध्ये तरतूद करून ठेवावी. नियमित केलेल्या २०-२५ वर्षे  गुंतवणुकीमुळे भरपूर असा निधी सहज जमा होऊ शकतो. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हे खातं किमान  १५ वर्षांचं असतं . ह्यामध्ये वार्षिक रु. १.५  लाख बचत करता येते. साधारण  व्याजदर ८.२ टक्के कमी अधिक असते , हे व्याजदर दरवर्षी बदलत असते . कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत किंवा पोस्टात पीपीएफचे खातं उघडता येतं.
  4.  थोडी गुंतवणूक सोन्यामध्येदेखील करायला हरकत नाही हवी.  गोल्ड फंड मध्ये  जास्त चांगले  पर्याय आहेत. सोने/चांदी यातील गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त होणार नाही असे पाहावे.
  5.  काही ठरावीक रक्कम नियमीतपणे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवावयास हरकत नाही पण हे करताना आर्थिक सल्लेगार , तज्ञ् ह्यांचे मार्गदर्शन घ्या, शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्या ऐवजी दीर्घ काळासाठी शेअर खरेदी करून निवांत राहा. आतापर्यंत शेअरमार्केट १०० पासून ते २९००० पर्यंत गाठलेली पातळी वरून तुम्ही अंदाज लावू शकता कि बाजार ने किती परतावा दिला आहे.
  6.  फक्त प्राप्तिकर बचती साठी  इन्शुरन्स, PPF  घेऊ नका, आपल्याकडे हेच केले जाते जे चुकीचे आहे.  त्याऐवजी इक्विटी लिंक्‍ड सेव्हिंग्ज स्कीम्स’(ELSS) आहेत अशा योजनेमध्ये गुंतवणूक करून कलम 80 सीअंतर्गत प्राप्तिकर वाचविता येतो आणि सोबत चांगला परतावा म्हणजे रिटर्न्स पण मिळतात . साधारण (ऍव्हरेज) 17 टक्के आसपास  इतका घसघशीत परतावा ह्यामध्ये मिळतो . 
  7. आपली सगळी पुंजी एकाच क्षेत्रात गुंतवू नका, त्याचे वर्गीकरण करा.
थोडक्या शब्दात मी  आर्थिक नियोजन ह्या विषयावर काही  मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत.  तर अश्या पद्धतीने जर तुम्ही नियोजन केले तर कोणत्याही कठीण परिस्थितीवर तुम्ही मात करू शकता. पण लक्ष्यात असुद्या असे नियोजन करताना कुटुंबातील सदस्यचे आणि तज्ञ गुंतवणूक सल्लागाराचे मार्गदर्शन जरूर घ्यावे.
   










Tuesday, June 28, 2016

अतृप्त



मन सारखं कुढत राहतं
तुला  भेटायला बोलवावं,  की नको बोलवावं म्हणून
एकटंच स्वतःशी भांडत राहतं

कधी कधी विचार येतो
तुलापण मला भेटावं,  असं वाटत  असेल का?
प्रेम नाही पण तीच ओढ
अजून तुझ्यात  शिल्लक राहिली असेल का?

ह्या शापित  आयुष्याचा गळा घोटावा,
असे वाटत असून ही मी आयुष्याचा तमाशा  बघत आहे,
कारण एकदा तरी  तू "इथं " भेटशील ,
माझ्याशी आपुलकीनं बोलशील,
मला माफ करशील  अशी आजही आशा आहे.

पण वेडे, जास्ती वेळ  लावू नको,
एकेकाळी तुज्यावर अधिराज्य गाजवणारा मी,
आता  तुझी वाट पाहून
पाहून थकलोय,
एवढ्या वर्ष्याने आता तुझा चेहराही मी विसरलोय,

हे शेवटचं बोलवणं समज ,
जर वाटलेच भेटावे तर,
पूवीच्या आपल्या भेटायच्या ठिकाणी नक्की ये,
मी तिथेच तुझी वाट पाहत,
गुलमोहरच्या झाडाखाली बसलेला दिसेन,

मग मला,
शेवटचा स्पर्श कर आणि
हळूच मिठीत घे. 
डोळे बंद होण्याआधी तू  आली आहेस,    
एवढी आठवण करून दे.

मग बघ, मी म्हणाल्या प्रमाणे
तुझी माझी ती शेवटचीच भेट असेल,
तुझ्या सोबत असून ही, तेव्हा मी तुझ्या सोबत नसेल.
 
तू आज ये, उद्या ये, वर्ष्याने ये, सात जन्माने ये 
मी इथेच तुला भेटेन,
नाही आलीस तर, जीव मात्र तसाच तेवत ठेवेन
 
आयुष्यभर झालेल्या कोंडमार्यावर
 शेवटची  फुंकर मारून  जा,
नाही म्हणू नकोस ,
शेवटी सोबत 'आपल्या' आठवणी देऊन जा.



  

Saturday, June 18, 2016

पाऊस पाणी‬ (चंकोबा)



आमच्याकडे पाऊस वेळेत पडेना किंव्हा दुष्काळ सदृश परस्थिती झाली कि वरूणदेवाला प्रसन्न करायचे विविध प्रकार होतात. पाऊस-पाणी मागणे(काही लोक चंकोबा म्हणतात ह्याला ), गाढवच लग्न लावणे, जो पर्यंत पाउस पडत नाही तो पर्यंत महादेवाला मंदिरात पाण्यात बुडऊन ठेवणे असे बरेच प्रकार सुरु असतात. परंपरागत लोकांच्या समजुती होत्या, आजही बर्याच खेड्यात किव्हा गावी असे प्रकार सर्हास चालतात. 

आम्ही लहान होतो तेव्हा ह्यातला असाच एक प्रकार खूप प्रसिद्ध होता तो म्हणजे पाऊस-पाणी मागणे म्हणजे चंकोबा करणे. रात्री ८ नंतर मोठी बुजुर्ग लोक  १०-१२ वयोगटातील मुलांना एकत्र करून त्यातला एकाला संपूर्ण नग्न करून डोक्यावर एक पाट द्यायचे, त्यावर एक खोटा चिखलाचा वरूणदेव बनवायचे , मग आम्ही सर्व त्या मुलाला घेऊन प्रत्येकाच्या दारात जाऊन ,

"पाऊस पाणी, आबाळ दानी, आभाळ भरलयं पाण्यानं, कणगी भरल्या दाण्यानं" 

असे म्हणायचो , मग घरातल्या बायका तांब्याभर पाणी आणि नैवेद्य म्हणून भाकरी भाजी आणायच्या, पाणी पायावर घालायचा आणि नैवेद्य आम्हाला द्यायच्या, आम्ही तो पिशवी मध्ये भरायचो. अस करत आम्ही सगळी गल्लीभर पाऊस पाणी मागत फिरायचो. सगळं फिरून झालं की शेवटी एका ठिकाणी मोठ्या अंगणात एकत्र जमायचो , पिशवीत जमलेला नैवेद्य वरूणदेवाला दाखऊन, उरलेला सर्व आम्ही तो अंगणात बसून खायचो.
 
नंतर नंतर मुले लाजायला लागलीत , म्हणून मग जेवायचे ताट तोंडासमोर पकडून(कोण आहे ते कळू नये म्हणून ) पाऊस पाणी मागायला लागले, नेहमी सारखे घरातल्या बायका तांब्याभर पाणी आणि नैवेद्य म्हणून भाकरी भाजी आणायच्या, तांब्याभर पाण्याने त्या पोराला आंघोळ घालायचे, पाणी पडत असताना तो पोरगा गोल गोल फिरणार आणि बाकी चे जोर जोरात,
 
"पाऊस पाणी, आबाळ दानी, आभाळ भरलयं पाण्यानं, कणगी भरल्या दाण्यानं"  असे ओरडणार . 

आमचे बुजुर्ग, गावातले लोक सांगतात कि एक वर्षी असाच दुष्काळ पडलेला, लोकांचे खूप हाल झाले होते तेव्हा एका बाई ने पाऊस पाणी मागितले होते, त्यासाठी गावची लाईट बंद केली होती , त्या वर्षी पाउस चांगला पडला होता म्हणे !! अर्थातच ह्या लहानपणी ऐकीव गोष्टी होत्या पण पावसा प्रति  त्यांची ह्या प्रथेवर किती श्रद्धा होती हे कळते.

आत्ता असे पाऊस पाणी मागायचे प्रकार कमी झालेत पण अजूनही बर्याच ठिकाणी पाऊस पडावा म्हणून असले नाना तर्हेचे प्रकार आजही सुरूच आहे. दोन दिवसा पूर्वी अशी घटना कर्नाटक मध्ये घडली त्याचा किती बाऊ केला गेला , आताच्या लोकांना हे अमानुष, मागासलेले वाटते. ह्यावर ब्रेकिंग न्यूज बनते, अश्या प्रथांना नावं ठेवली जातात. आता मी ह्या गोष्टीचे समर्थन नाही करत की हे किती योग्य आहे आणि अयोग्य आहे ते. काळानुसार काही प्रथा नक्कीच बदलायला हव्यात. पण ह्या प्रथा आपल्याच होत्या आणि अश्या समजुती जायला अजून वेळ लागणार आहे.

Saturday, April 30, 2016

प्रेमाचा experiment





माझ्या range मध्ये बरीच channel होती,
matching frequency ला dish नेहमीच झुलत होती ,
मनाचा receiver एवढा powerful असायचा,
की range च्या बाहेरच्या पण   frequency catch करायचा. 

त्यातल्या त्यात एखादी बरी बघून 
channel auto  tune करायचो ,
महिना दोन महिन्याच्या delay नंतर input मिळायचं,
एकदा input मिळालं रे मिळालं की ,
माझ प्रेम infinity च्या gain नं  amplified  व्हायचं. 

अर्थात अश्या  amplified प्रेमात
 external noise खूप येणार ,
high pass, low pass filter  मारून मारून,
मी तो nullified करणार ,
परत  noise  येणार, परत मी filter करणार,
असा प्रेमाचा experiment बद्दल माझ नेमीच असायचं ,
पण अपेक्षित output मला कधीच नाही यायचं.

जेव्हा लोक  माझ्या experiment बद्दल विचारायचे,
तेव्हा मात्र मी त्यांना manipulated output  द्यायचो,
कारण इथं माझाच output येत नसायचे
आणि  ते demultiplexer Circuit घेऊन फिरायचे . 

  काही केल्या experimentoutput टचं नाही यायचं,
आता  nobel चुकेल कि काय असंचं सारखं वाटायचं,
जवळच्या मित्रांना experiment बद्दल सांगायचो 
तेव्हा मित्र बोलायचे

नेहमी प्रमाण तुझ output
 चुकीच आलय,
कारण सवयी  प्रमाणे तू  आताही,
चुकीच input select केलय. 

माझा experiment तिथेच थांबायचा,
 परत माझा dish matching frequency search करायचा.

                                                                    ........... नितीन माळी   





Saturday, April 9, 2016

तिची कॅन्टीन वरची पहिली भेट.








                         कृतिका आणि मी म्हणजे 'दो जिस्म एक जान' असं म्हंटल तर वावग ठरणार नाही , आहेच आम्ही असे, एकमेकांचे सोलमेट म्हणतात ना! तसंच काहीसं, एकमेकांच्या मनाचे आरसे. कृतिका हॉस्टेल ला राहायला गेल्यापासून मला एक एक दिवस म्हणजे कित्येक वर्ष वाटतंय, आता भेटणं शक्य नसल्यामुळं आम्ही फक्त फोन वरच  कनेक्टेड असतो, माहीती नाही आम्हाला, वायरलेस असलेल्या टेक्नॉलॉजि ने कस घट्ट बांधून ठेवलं आहे. मला हे अंतर नकोच वाटतेय, माझी समजूत काढायला ती वेडी म्हणते डिस्टन्स रिलेशन मध्येपण एक वेगळीच मज्जा असते. ती पण अनुभव एकदा. 

ती मला एरवी भेटल्यावर कार्तिक इकडे चल, कार्तिक तिकडे चल, कार्तिक हे खाऊ, ते खाऊ, ह्याला भेटू ,त्याला भेटू अस तीच सतत चालूच असायचं,  मी पण कधी तिला कधी नाही म्हणालो नाही, मला तिचा हट्ट पुरवायला मज्जा येते. साला!, मुलींचा जन्मच हट्ट करण्यासाठी असतो अन आपला तो पूर्ण करण्यासाठी, त्या हट्टा पेक्ष्या त्यांची लाडीगुडी, तो निरागस भोळा चेहरा, खोटा खोटा राग हे अनुभवणे हि पण एक मज्जाच असते. 

हल्ली आम्ही फोनवरच बोलतो. ती म्हणते तस, ह्यात पण एक वेगळीच गम्मत आहे. कृतिका कित्ती कित्ती बोलते म्हणून सांगू? मी तर तिचेच ऐकण्यात मश्गुल असतो. ती बोलतच जाते , मी ऐकतच राहतो , कधी कधी वाटतं, माझ पिल्लू उगाच हॉस्टेलला गेलं, तिच्यापासून दूर असतो म्हणून फोनवर तासन तास तिची चिव चिव ऐकायला मी अक्षरशः व्याकुळ असतो, दिवसभरात काय काय घडलं  इथं पासून ते माझी आठवण कधी , किती वेळा ,कशी कशी आली, इथं पर्यंत मला ती सर्व सांगत असते.

आज प्रवास करताना सगळा भूतकाळ डोळ्यासमोर येतोय, तिच्या पहिल्या भेटीपासूनचा तो आजपर्यंत चा सर्व क्षण. मी ठरवलं आहे, तिला काहीही करून भेटायचं, आणि एक अनपेक्षित, सुखद धक्का तिला द्यायचा. तिच्या ओढीनं मी ६०० किलोमिटरचा प्रवास करत करत तिच्या अनोळखी शहरात आलोय. तिच्या मैत्रिणींच्या मदतीने. तिला मोगरा खूप आवडतो , म्हणून डब्बा भरून स्टेशन वरून मोगरा आणला आहे. 

मी तिला पाहायला, भेटला खूप  उतावीळ होतोय, किती तर वेळ आता मी कॅन्टीन ला बसून आहे , तिच्या मैत्रिणीच आणि माझ ठरल्या प्रमाणे, त्या कृतिकाला कॅन्टीन ला घेऊन येणार  होत्या. 'तुला एक गम्मत दाखवायची आहे' ! असं म्हणत तिच्या मैत्रिणीनि  तिला डोळ्यावर पट्टी बांधून होस्टेल मधून तिला घेऊन येत होत्या,  कृतिका विचारून विचारून हतबल झाली , काय आहे गम्मत ? काही आगाऊपणा नाही ना? अजून किती वेळ असं? मैत्रिणीनी तिला दोन्ही हाताला धरून कॅन्टीन पर्यंत असच काहीतर बाता मारत घेऊन आल्या. आजू बाजूचे सर्व लोक हा काय प्रकार आहे म्हनून पाहत होते. 

ती समोर आली , तिला इतक्या दिवसाने पासून मला दोन मिनटे अस वाटलं कि 'पटकन पुढे जावे आणि डोळ्यावरची पट्टी काढावी आणि सांगावे कि बघ, कोन आलोय तुला भेटायला' . तिच्या मैत्रिणी जवळ आल्या, सगळ्या गमतीने हसत होत्या, त्यांनी कृतिकाचा धरलेला हात सोडला. मी लगेच पुढे झालो आणि डब्यातील मोगरा तिच्या नाकापर्यंत नेला. तिने दीर्घ श्वास रोखून त्याचा गंध घेतला आणि त्याच क्षणाला तिने डोळ्यावरची पट्टी बाजूला केली. 
जशी तिने डोळ्यावरची पट्टी बाजूला केली तशी तीने मला पाहून जोरात एकच किंचाळी ठोकली. त्यात तिच्या मैत्रिनींनी पण हातभार लावला. दोन्ही हात गालावर लावत, आश्चर्याने ती मला बघतच राहिली. तीच्या डोळ्यात टचकन पाणी उभे राहिले होते, तिला काय बोलायचे सुचत नव्हते, आजूबाजूचे सर्व विसरून दोन पाऊले पुढे आली आणि माझ्या मिठीत येवून फुंदुन फुंदुन रडू लागली. एका हातात डब्बा पकडून दुसर्या हाताने मी तिला कवेत घेतले, आणि तिला शांत करू लागलो. 

ती माझ्या मिठीत व्यक्त तर होऊ शकत होती पण माझे तस नव्हत. मी मात्र,  "ये वेडे, असं काय करतेस, बोल माझ्याशी" अस म्हणत,  तिची पाठ थोपटत राहिलो, अन  तिची मिठी मात्र प्रत्येक हुंधक्या सोबत तेवढीच आवळत गेली. 


('तिची कॅन्टीन वरची पहिली भेट' ह्या काल्पनिक कथा संग्रहातून :P )

                                                                                                                               नितीन म माळी. 




Saturday, April 2, 2016

पाऊस पडून गेल्यावर

पाऊस पडून गेल्यावर 




पाऊस पडून गेल्यावर,
लक्षात राहते, ती चिंब भिजलेली माती,
कितीही नाही म्हणले तरी,
ओलावते मनातील गोठवलेली नाती,

पाऊस पडून गेल्यावर, 
थंडगार बोचरी हवा अंगात शिरू पाहते,
कितीही नाही म्हणले तरी,
कुठल्यातरी आठवणींशी, एकटीच खेळू पाहते. 

पाऊस पडून गेल्यावर, 
खिडकीतून बाहेर बघत, एकटाच उभा राहतो,
 भिजलेले पक्षी, झाडे, घरे बघून,
आतल्या आत मी हि, भिजून जातो. 

पाऊस पडून गेल्यावर, सगळ कसं बहरून येतं,
मग,
 मन स्वतालाच ओढत, घराबाहेर घेऊन जातं,

रंगबेरंगी फुलपाखरे, झरझरणार पाणी, 
मातीचा सुगंध, पक्ष्यांची मधुर गाणी,
असं सगळं बघून, मन गायला लागतं, 
मधेच, गवती चहाची तल्लब होते,
आणि सोबत, गरम भजी मागायला लागत. 

पाऊस पडून गेल्यावर,  
सगळेच हळूहळू बाहेर पडतात ,
माझ्यासारखेच इतर हि चार लोक,
 टपरीवर जमायला लागतात. 

दरवर्षी मृगाचा घनं, असाच गोंधळ घालतो,
मागील वर्षी घालवलेले क्षण, 
पुन्हा तसाच, सोबत घेऊन येतो,

पुन्हा त्याच आठवणीच डबक, परत भरून येतं ,
आणि, मन पुढच्या पाउसाची, 
 परत वाट बघायला लावत. 

                                     …… नितीन माळी








Friday, April 1, 2016

येडं मन

येडं मन. . . 

काय माहिती येडं मन, कसं भूलायला लागलं,
तुझ्या ओढीनं,  पुरतं झुरायला लागलं,
फुल पाखरागत, उडाला लागलं,
रान माळात, हिंडायला लागलं.

दररोज, थोडं थोडं फुलायला लागलं,
तुझचं गुणगान, गायला लागलं,
थोडं थोडं क्रांतिकारी, व्हायला लागलं.  
बाकी जग सारं, विसरायला लागलं,

तुझं मन, ह्याला झुलवायला लागलं,
दीड-दमडीच ते , भाव खायला लागलं,
इतक्या दिवसाची ओळख, विसरायला लागलं,
माझ्या पुढ तू कोण?,असं विचारू लागलं.

एवढ झाल्यावर हे मन , तंतनायला लागलं,
येता जाता उगाच, भडकायला लागलं,
बंद खोलीत कोंढून, रडायला लागलं,
अंधारात एकटच, कुढायला लागलं.

दिस असचं, सरू लागलं,
मन हळू हळू, घट्ट व्हायला लागलं,
स्वतःच, कसं तरी सावरायला लागलं,
जरा जरा माणसात यायला लागलं.

स्वतःला जेव्हा ओळखू लागलं,
स्वतःसाठी थोडं जगायला लागलं,
तेव्हा पासून खरं ते , उमलायला लागलं, फुलू लागलं,
बागडू लागलं, बोलू लागलं,
आनंदाने नाचू हि लागलं. 
 .

येडं मन.....कुठलं. . . 
                                         . . . नितीन माळी

Wednesday, March 2, 2016

वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो


थोडासा धीर धर आधी कामाचं बघतो 
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो 

लोक म्हणत्यात यंदा दुष्काळ जोराचा आलायं , 
नेहमी प्रमाणे ह्या वर्षी पण  पाउस गायब झालायं, 
हालक्या सरीतच धान्य पेरून घ्यावं म्हणतोय ,
कामाच्या सवडीतून जमेल तसे तुझाकडे लक्ष घ्यावं म्हणतोय ,
थोडासा धीर धर आधी कामाचं बघतो, 
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो,

 फक्त अर्धच  शेत हिरवं पिवळ झालंय ,
पाण्याविना अर्ध, केव्हाच मरून गेलयं ,
पाटलाकड जाऊन थोडं उसनं पैसे आणावं म्हणतोय,
अर्धच  का असना तेवढं तरी फवारून घ्यावं म्हणतोय ,
एवढ फक्त काम होउदे
हाती चार पैसे येउदे
थोडासा धीर धर आधी पैश्याचे बघतो 
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो

शेतामध्ये माल यंदा कमीच झालाय  ,
उसनं आणि ब्यांक कर्ज चा फास  गळ्याला आलंय, 
आता कुठ काय आधार मिळतोय का बघावा म्हणतोय 
सरकारी ऑफिस ला जरा जाऊन याव म्हणतोय
आज जरा मी घाईत आहे,
सगळ लक्ष्य फायलीत आहे 
थोडासा धीर धर आधी कर्जाचे बघतो,
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो

मायबाप सरकारन १५०० रुपये अनुदान दिलंय 
म्हणालं तसं  तुझ कमीच नुकसान झालंय
काही  का असंना चार पैसे लागल्यात हाताला
तेवढ तरी मागायचे कुठ आणि कोणाला

आता थोड तालुक्याला जाऊन येतो ,
 आधी पोरग्याला शाळेची पिशवी अन म्हातारीच औषध आणतो 
येताना तुला गजरा नक्की आनेण

अजून थोडासा धीर धर
आधी त्याचं  बघतो 
वेळ मिळाला तर नक्की तुझ्यावर प्रेम करतो. 

………  नितीन माळी 



Wednesday, February 10, 2016

माझ्यातला "मी"


माझ्यातला  "मी"
आज तुझ्या आठवणींनी पहाड उभा केला,
क्षणात एका, आसवांच्या सागराने, त्याला त्यात बुडवला    

लगेचच आशेच्या स्वप्नांनी, एक होडी तयार केली
बघता बघता भुर्रकन, ती चार वर्ष मागे गेली    

छान छान आठवणींचे टप्पे, मी सहज पार केले,
काही टप्याने तर मला, अगदीच गार केले    

आता माझी होडी , थोडी संथ झाली होती,
सुखाचा डोह पार करून, वेगळीकडेच भरकटली होती    

अश्यातच गैरसमजुतीच्या वादळाने मला,
 भर समुद्रात गाठले, 
थोड्या वेळचे बे-मोसमी ढग बरसत असतील
असे मला वाटले

एकट्याने मी त्या वादळाशी दोन हात केले,
ते वादळ गेले आणि दुसरेच वादळ आले

अशी कित्येक वादळे पेलत पेलत 
मी समुद्र पार केला 
कदाचित त्या वादळांनीच,
मला समुद्रा बाहेर यायला आधार दिला

आता समुद्र पण संपला होता
आणि
पहाड पण दिसत नव्हता
कारण आता माझ्यातल "तुला" शोधण संपल होत
आणि 
माझ्यातल्या "मी" चा नवीन प्रवास सुरु झाला होता .
………. नितीन माळी