Thursday, January 21, 2016

बुरसटलेली बुद्धिजीवी

बुरसटलेली बुद्धिजीवी 


आपले आस्तित्व टिकवण्यासाठी माणसाने बराच संघर्ष केला, वेग वेगळे शोध लावले, माणसाने बरीच प्रगति केली, कित्येक प्रतिकूल परिस्थितिवर मात करून तो २१व्या शतकामध्ये  आला आहे. एव्हाना आत्ता तो खूपच प्रगत आहे , सर्वच गोष्टीने,
पण खरच तो एवढा बुद्धिवान झाला आहे का? एवढे सर्व सुख सोयी मिळवून सुद्धा तो सुखी आहे का? पूर्वीचा माणूस आणि आत्ताचा माणूस ह्याच्या मानसीकतेमध्ये  काही बदल झाला आहे का? की तो तसाच आहे जसा आधी होता तसा? 
  
साधारण गेल्या १५-२० वर्ष्यात माणसाच्या जीवनात खूपच बदल झाला. झपाट्याने जग बघता बघता जवळ आले, वैद्यानिक क्रांति झाली, इंटरनेट, सोइल नेटवर्कमुळे लोकांना जग ठेंगने वाटू लागले, त्याचे चांगले परिणाम आणि प्रभाव पण दिसू लागला आणि त्यामुळेच एक गुपित काळी बाजू पण समोर येऊ लागली. मी वाढत्या  विज्ञानाला किव्हा तंत्रज्ञानाला दोष नाही देत, एखादा शोध लावतो तेव्हा काळाची गरज बघून चांगल्या गोष्टीसाठी शोध लावला जातो उदा.- औषधशास्त्र, वैध्यकीयशास्त्र , रसायनशास्त्र, संगणक, आधुनिक हत्यारे  आणि बरेच काही शोध लागले ते समाज्याच्या कल्याणासाठी पण आता त्याचा वापर कश्यासाठी, कसा होतोय हे पण आपल्याला माहिती आहे. एकाला लाभलेलं वरदान हे दुसऱ्यासाठी शाप बनत चालले आहे. मग हे शोध चुकीचे होते का? फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण आहेत का? नाही नक्कीच नाही. 

मग, ह्यात चुकी कोणाची? कोणाचा दोष आहे? मी तर असेच म्हणेन कि ह्यात दोष आहे बुरसटलेल्या बुद्धीजीवींचा अर्थात ठराविक माणसांचा, त्यांच्या गंजलेल्या मनाचा, अशी माणसे ज्यांचे सामाजिक कार्य शून्य आहे, अशी माणसे जे समाज्यात आपले अस्तित्व खोट्या गोष्टींच्या आधारावर शोधत बसलेली आहेत. ती हीच माणसे आहेत जी किड्या मुंग्यांसारखी जन्माला येतात आणि  किड्या मुंग्यांसारखी मरून जातात. ह्या अश्या लोकांनी विज्ञानाचा वापर चुकीचा केला. 

अशी माणसे आधी दिसत नव्हती का ?आताच कशी दिसू लागली? असे काही लोक म्हणू शकतात. पण तसे नाही, ह्या आधी हि अशी लोक होती पण इंटरनेट, प्रींटमेडिया, फेसबुक, व्हाट्स -आप मुळे समाज्यात किती विक्षिप्त लोक आहेत ह्याची जाणीव आता होत आहे. पूर्वी अश्या लोकांना साधे भोळे समजत असत आपण, हल्ली फेसबुक प्रोफाईल बघितले तरी समजते माणसाची मनोवृत्ती किती खालच्या तलाची आहे. इंटरनेट, फेसबुक, व्हाट्स -आप मुळे माणूस माणसाच्या खरच जवळ आली का हो? 


जागतिक दहशतवादी संघटना  इंटरनेटचा वापर त्यांचे साम्राज्य पसरवण्यासाठी करत आहे, नुसत्या फेसबुक कॉम्मेंट मुळे लोकांचे जीव जाऊ लागले आहेत. जगात सेल्फीच्या आहारी जाऊन आत्तापर्यंत खूप लोक मेले त्यात सर्वाधिक म्हणजे  तब्बल २७ लोक मेले आहेत जे भारतीय होते. मृत देहासोबत जेव्हा सेल्फी पाहण्यात आल्या तेव्हा संवेदनाहीन तो मेलेला मृत धड आहे कि हा फोटो काढणारा असा प्रश्न स्वत्तला पडायला लागला आणि हे तंत्रज्ञानाच्या आती वापरामुळे झाले नाही तर माणसाने बुद्धी गहाण ठेवली म्हणून झाले  … स्टीव जॉब्स, बिल गेट, मार्क झुकरबर्ग ह्यांनी पण तंत्रज्ञानाचा वापर केलाच पण त्यामुळे त्यांचे काही नुकसान नाही झाले, फायदाच झाला आहे. कट्ट्या वरती, कोपऱ्या वरती जाउन मित्रांच्यात रमणारी लोक हल्ली व्हाट्स -आप ग्रुप वर वाद-विवाद करत बसलेली दिसतात. बाथरूम पासून ते बेडरूम पर्यंत सोबतीला हल्ली  मोबाईल असतोच,  महिलांच्या फसवणूकीचा मुद्दा तर नेहमीच  ऐरणीवर असतो.

सोइल नेटवर्क साईटवर प्रत्येकाने आपल्या सोयीचा झेंडा उचलला आहे, प्रत्येकाने आपले आपले रंग वाटून घेतले आहेत आणि ह्यातून वाद विवाद होऊन जे गुन्हे घडत आहेत ते अश्या कोत्या मनाच्या वृत्तीमुळेच नाहीतर ग्रुप मधून काढले म्हणून अडमीन वर चाकू हल्ले झाले नसते.

लोक्कांना विचार करण्याची वेळ आली आहे खरच आपण ह्या सर्व गोष्टीच्या आहारी गेलो आहे का? सवयीचे रुपांतर जेव्हा व्यसना मध्ये होते तेव्हा येणार्या परिणामाला सामोरे जाण्याची पण सवय आताच लावून ठेवलेली बरी, येणारा काळ अजून खूप काही घेऊन येणार आहे.



No comments:

Post a Comment